6 त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले: 7 “बलवान आणि धैर्यशील असा. अश्शूरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले मोठे सैन्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका, कारण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपल्यासह आहे. 8 त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.
9 नंतर, जेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याच्या सर्व सैन्याने लाखीशला वेढा घातला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा हिज्कीयाह राजा आणि यहूदीयाच्या सर्व लोकांसाठी हा संदेश त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर देऊन त्यांना यरुशलेमकडे पाठवले:
16 सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले. 17 राजाने इस्राएलचे परमेश्वर याहवेहची थट्टा करणारी पत्रेही लिहिली आणि त्यांच्याविरुद्ध असे म्हटले: “जशी इतर देशातील लोकांच्या दैवतांनी त्यांच्या लोकांची माझ्या हातून सुटका केली नाही, त्याचप्रमाणे हिज्कीयाहचे दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून सोडविणार नाही.” 18 तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले. 19 यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते.
20 राजा हिज्कीयाह आणि आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा यांनी याबद्दल रडून स्वर्गाकडे प्रार्थना केली. 21 आणि याहवेह यांनी एक देवदूत पाठवला, त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व लढवय्ये, सेनापती आणि अधिकारी यांचा नाश केला. त्यामुळे तो अपमानित होऊन स्वतःच्या भूमीकडे मागे फिरला. आणि जेव्हा तो त्याच्या दैवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्या काही मुलांनी, जे त्याचे स्वतःचे रक्त आणि मांस होते, त्यांनी त्याला तलवारीने कापले.
22 अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला. 23 पुष्कळ जणांनी यरुशलेमकडे याहवेहसाठी अर्पणे आणली आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह याच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या. तेव्हापासून तो सर्व राष्ट्रांद्वारे अत्यंत आदरणीय मानला गेला.
27 हिज्कीयाहकडे फार मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने त्याच्याकडे असलेले चांदी आणि सोने आणि मौल्यवान रत्ने, मसाले, ढाली आणि सर्वप्रकारच्या मौल्यवान वस्तूंसाठी भांडारे तयार केली. 28 हंगामाचे धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांचा साठा ठेवण्यासाठी त्याने इमारती बांधल्या; आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारची गुरे आणि कळपांसाठी गोठे, मेंढवाडे बांधले. 29 त्याने गावे विकसित केली आणि अधिक संख्येने गुरे मिळविली, कारण परमेश्वराने त्याला खूप मोठी संपत्ती दिली होती.
30 हिज्कीयाहनेच गीहोन झर्याचा वर जाणारा मार्ग अडविला आणि पाण्याचा मार्ग दावीदाच्या नगरीच्या पश्चिमेकडे नेला. त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तो यशस्वी झाला. 31 परंतु त्या देशात घडलेल्या चमत्कारिक चिन्हाबद्दल त्याला विचारण्यासाठी बाबेलच्या राज्यकर्त्यांनी जेव्हा दूत पाठवले, तेव्हा परमेश्वराने त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्या अंतःकरणातील सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्याला सोडून दिले.
32 हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना व त्याच्या श्रद्धेचे कार्य आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याच्या दर्शनात त्याने लिहिलेल्या यहूदीयाच्या व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत. 33 हिज्कीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या वंशजांबरोबर डोंगरावरील कबरेत पुरण्यात आले. तो मरण पावला तेव्हा सर्व यहूदीया व यरुशलेमच्या लोकांनी त्याचा सन्मान केला. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.
<- 2 इतिहास 312 इतिहास 33 ->
Languages