4 परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही अंधारात असू नये जेणे करून हा दिवस तुम्हाला अचानक येणाऱ्या चोरासारखा चकित करेल. 5 परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सर्व प्रकाशाची व दिवसाची मुले आहात. आम्ही रात्रीचे किंवा अंधकाराचे नाही. 6 आपण झोपी गेलेल्या सारखे असू नये, परंतु जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे. 7 झोप घेणारे, रात्री झोपतात, मद्य पिणारे, रात्री मद्य पितात. 8 परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतीचे चिलखत धारण करावे आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे. 9 क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे. 10 ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे. 11 म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची वुद्धी करण्यासाठी झटा.
16 सर्वदा आनंदित राहा, 17 निरंतर प्रार्थना करा, 18 सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.
19 पवित्र आत्म्याला विझवू नका. 20 संदेशाला तुच्छ मानू नका. 21 परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा, 22 सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा.
23 परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत. 24 ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे ते विश्वासू आहेत आणि ते करतीलच.
Languages