6 त्याने पन्नास हात लांब व तीस हात रुंद अशी खांबांची एक पंक्ती बनविली. त्याच्यासमोर एक द्वारमंडप होता व त्यासमोर खांब व त्यावर छत होते.
7 त्याने राजासनासाठी खोली बांधली, जी न्यायाची खोली, जिथे बसून तो लोकांचा न्याय करणार, त्या खोलीला जमिनीपासून छतापर्यंत गंधसरूच्या फळ्यांनी झाकले. 8 आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला.
9 या सर्व इमारती, बाहेरच्या बाजूपासून ते दरबारापर्यंत आणि त्यांच्या पायापासून छपराच्या वळचणीपर्यंत, उच्च प्रतीचे दगड घेऊन त्यांना आकारात कापून आतील व बाहेरील बाजूने त्यांना गुळगुळीत बनवून वापरले होते. 10 उत्तम दर्जाच्या मोठमोठ्या दगडांनी त्यांचा पाया घातला गेला. काही दगड दहा हात[d] तर काही आठ हात[e] लांबीचे होते. 11 त्याच्या वरच्या बाजूने योग्य आकारात कापलेले उच्च दर्जाचे दगड आणि गंधसरूच्या तुळया होत्या. 12 मोठ्या अंगणाच्या सभोवती घडलेल्या दगडांच्या तीन रांगा व छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती, याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणाला व द्वारमंडपालाही तसेच होते.
15 त्याने कास्याचे दोन खांब तयार केले, प्रत्येक खांबाची उंची अठरा हात[g] आणि घेर बारा हात[h] होती. 16 खांबांच्या शिखरांवर बसविण्यासाठी त्याने कास्याचे दोन ओतीव कळस केले; प्रत्येकाची उंची पाच हात[i] होती. 17 खांबांवर असलेल्या प्रत्येक कळसांना सात साखळीच्या विणलेल्या जाळ्या बसविल्या होत्या. 18 खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले. 19 द्वारमंडपात असलेल्या खांबांवरील कळस कमळांच्या[j] फुलांच्या आकाराचे, चार हात[k] उंच होते. 20 दोन्ही खांबांच्या कळसांना लागून वाटीच्या आकाराच्या जाळीभोवती, दोनशे डाळिंबाच्या रांगा केलेल्या होत्या. 21 त्याने हे खांब मंदिराच्या द्वारमंडपाकडे ठेवले. दक्षिणेकडे ठेवलेल्या खांबाला त्याने याखीन[l] आणि उत्तरेकडील खांबाला बवाज[m] असे नाव दिले. 22 खांबांवर असलेले कळस कमळांच्या आकाराचे होते. याप्रकारे खांबांचे काम पूर्ण झाले.
23 त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात[n] दोरी लागत असे. 24 त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर दहा काकड्या होत्या. या काकड्या हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या.
25 हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते. 26 त्याची जाडी चार बोटे[o] होते, आणि पेल्याचा घेर, कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ[p] पाणी मावत असे.
27 त्याने कास्याचे दहा चौरंग बनविले; प्रत्येकाची लांबी चार हात, रुंदी चार हात आणि उंची तीन हात[q] होती. 28 चौरंग याप्रकारे बनविले होते: त्याला बाजूने लाकडाच्या फळ्या जोडल्या होत्या. 29 फळ्यांच्या मध्यभागी व तिवडीवरही सिंह, बैल आणि करूब यांच्या आकृती कोरल्या होत्या आणि सिंहाच्या व बैलांच्या ठोकलेल्या लोंबत्या झालरी होत्या. 30 प्रत्येक चौरंगाला चार कास्याची चाके व कास्याच्या धुर्या होत्या आणि प्रत्येकाला गंगाळे होती, ज्याला आधार देण्यासाठी ओतीव स्तंभ असून त्यांच्या बाजूंनी लोंबत्या माळा होत्या. 31 तिवडीच्या आतील बाजूस त्याचे तोंड उघडे होते व त्याला एका हाताएवढी खोल गोलाकार पट्टी होती. हा उघडा भाग गोल होता, आणि त्याच्या व्यासाचे माप दीड हात होते. त्याच्या तोंडाभोवती कोरीव काम होते. तिवडीचे खांब गोल नसून चौकोनी होते. 32 चार चाके खांबांच्या खाली होती आणि चाकांच्या धुर्या तिवडीला जोडलेल्या होत्या. प्रत्येक चाकाचा व्यास दीड हात होती. 33 ही चाके रथाच्या चाकांप्रमाणे बनविली होती; धुर्या, कडा, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव काम होते.
34 प्रत्येक तिवडीला, चारही कोपर्यांना चार दांडे होते, जे तिवडीला अखंड असे होते. 35 तिवडीच्या वरच्या बाजूला अर्धा हात गोलाकाराची खोल पट्टी होती. त्याचे आधारस्तंभ आणि खांब तिवडीच्या वरच्या बाजूने जोडलेले होते. 36 आधारस्तंभाच्या आणि खांबांच्या पृष्ठभागावर करूब, सिंह आणि खजुरीची झाडे कोरली होती आणि सभोवार लोंबत्या माळा होत्या. 37 अशाप्रकारे त्याने या दहा तिवड्या तयार केल्या. त्या सर्व एकाच साच्यात तयार केलेल्या असून ते सारख्याच मापाच्या आणि आकाराच्या होत्या.
38 त्यानंतर त्याने कास्याची दहा गंगाळे बनविली, प्रत्येकात चाळीस बथ[r] पाणी मावत असे आणि त्याचा व्यास चार हात होता, त्या दहा तिवडीतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते. 39 त्याने पाच तिवड्या मंदिराच्या दक्षिणेकडे ठेवल्या आणि पाच उत्तरेकडे. त्याने हौद मंदिराच्या दक्षिणेस; दक्षिणपूर्वेच्या कोपर्यात ठेवला. 40 त्याने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले.
48 याहवेहच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती:
- a अंदाजे 45 मीटर
- b अंदाजे 23 मीटर
- c अंदाजे 14 मीटर
- d अंदाजे 4.5 मीटर
- e अंदाजे 3.6 मीटर
- f किंवा हुराम
- g अंदाजे 8.1 मीटर
- h अंदाजे 5.4 मीटर
- i अंदाजे 2.3 मीटर
- j शोशांसारखे दिसणारे फूल
- k अंदाजे 1.8 मीटर
- l याखीन अर्थात् तो स्थापित करतो
- m बवाज अर्थात् त्याच्या ठायी सामर्थ्य आहे
- n अंदाजे 14 मीटर
- o अंदाजे 7.5 सें.मी.
- p अंदाजे 44,000 लीटर
- q अंदाजे 1.4 मीटर
- r अंदाजे 880 लीटर
Languages