3 एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले, 4 तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.” 5 नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला.
7 याहवेहचा दूत परत दुसर्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.” 8 तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला. 9 तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला.
10 एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
11 याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.”
14 एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मलाही मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
15 याहवेहने त्याला म्हटले, “तू आलास त्या मार्गाने परत दिमिष्काच्या वाळवंटाकडे जा. आणि तिथे जाशील तेव्हा हजाएलचा अरामचा राजा म्हणून अभिषेक कर. 16 आणि निमशीचा पुत्र येहूचा सुद्धा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर व आबेल-महोलाह येथील शाफाटचा पुत्र अलीशाचा तुझा वारस म्हणून संदेष्टा होण्यास अभिषेक कर. 17 हजाएलच्या तलवारीपासून जो कोणी निसटेल त्याला येहू मारून टाकेल आणि जे येहूच्या तलवारीपासून निसटतील त्यांना अलीशा जिवे मारेल. 18 तथापि बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत किंवा आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, असे सात हजार लोक मी इस्राएलात राखून ठेवले आहेत.”
21 तेव्हा अलीशा त्याच्यापासून निघून परतला. त्याने आपल्या बैलाची एक जोडी घेतली आणि ती कापली. त्याने नांगरणीची साधने पेटवून त्यावर मांस शिजविले आणि लोकांना दिले आणि त्यांनी ते खाल्ले. मग तो एलीयाहचा अनुयायी होण्यास निघाला आणि त्याचा सेवक झाला.
<- 1 राजे 181 राजे 20 ->
Languages