3 सोराने स्वतःसाठी एक मजबूत किल्ला बांधला आहे आणि धुळीएवढी चांदी आणि चिखलाप्रमाणे रस्त्यात शुद्ध सोन्याचे ढिग लावले आहेत. 4 पाहा! परमेश्वर, तिला तिच्या भूमीवरून हाकलून लावेल आणि तो तिच्या सागरी शक्तीचा नाश करील; अशाप्रकारे तिला आगीत भस्मसात करील.
5 “अष्कलोन हे पाहील आणि भयभीत होईल! गज्जाचे लोक भीतीने खूप थरथर कापतील, आणि एक्रोन शहराची आशा नष्ट होईल. गाझामधील राजा नाश पावेल व अष्कलोनात यापुढे वस्ती राहणार नाही. 6 अश्दोदात अनोळखी येवून आपली घरे वसवतील व पलिष्ट्यांचा गर्व नाहीसा करीन. 7 त्यांच्या मुखातले रक्त आणि दातांतले निषिध्द अन्न मी काढून टाकीन; यहूदाच्या वंशाप्रमाणे तेही आमच्या देवासाठी शेष असे एक घराणे म्हणून राहतील आणि एक्रोनचे लोक यबूस्यांसारखे होतील.
8 माझ्या देशातून कोणत्याही सैन्याने येवू-जाऊ नये म्हणून मी माझ्या भूमीभोवती तळ देईन, कोणीही जुलूम करणारा त्यांच्यातून येणारजाणार नाही. कारण आता मी स्वत: त्यांच्यावर आपली नजर ठेवीन.”
14 परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. माझा प्रभू परमेश्वर, तुतारी फुंकेल आणि दक्षिणेकडून वावटळीप्रमाणे तो चालून येईल. 15 सेनाधीश परमेश्वर त्यांचे रक्षण करील आणि ते दगड व गोफणीचा उपयोग करून शत्रूंचा पराभव करतील व त्यांना गिळतील व मद्यप्राशन केल्याप्रमाणे आरोळी करतील आणि ते वेदीच्या कोपऱ्यावरील कटोऱ्यांसारखे भरुन वाहतील.
16 आपल्या कळपाप्रमाणे परमेश्वर देव त्यादिवशी त्यांचे संरक्षण करील; आपले लोक त्यास मुकुटातील रत्नांप्रमाणे त्यांच्या देशात उच्च होतील. 17 हे सर्व किती मनोरम व किती सुंदर होईल! तरुण पुरुष धान्याने आणि कुमारी गोड द्राक्षरसाने पुष्ट होतील.
<- जखऱ्या 8जखऱ्या 10 ->