2 मग मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाने दिलेली वीणा घेऊन उभे होते.
3 देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते.
5 नंतर मी बघितले आणि साक्षीच्या मंडपाचे परमेश्वराचे स्वर्गातील भवन उघडले गेले. 6 आणि त्या भवनातून सात देवदूत बाहेर आले; त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. त्यांनी स्वच्छ, शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते. 7 तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. 8 आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला, त्याने परमपवित्रस्थान भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत कोणीही आत जाऊ शकला नाही.
<- प्रकटीकरण 14प्रकटीकरण 16 ->