3 आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. 4 त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला. 5 आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले. 6 आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
7 आणि स्वर्गात युद्ध झाले; मिखाएल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. 8 पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही. 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
10 आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला;
13 आणि अजगराने बघितले की, त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला. 14 परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्धकाळ तिचे पोषण केले जाईल. 15 आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. 16 पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली. 17 तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला; 18 आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.
<- प्रकटीकरण 11प्रकटीकरण 13 ->