Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
95
उपकारस्मरणाचे गीत
1 याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू;
आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.
2 उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू;
स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
3 कराण परमेश्वर महान देव आहे
आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
4 त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत;
पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
5 समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला,
आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली.
6 याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू,
त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
7 कारण तो आपला देव आहे,
आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत.
आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
8 मरीबा *कलहयेथल्याप्रमाणे किंवा मस्सापरीक्षाच्या दिवशी रानात केले
तसे आपली मने कठीण करू नका,
9 तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले,
आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.
10 चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो,
आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत;
त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीतत्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
11 म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की,
हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.

<- स्तोत्रसंहिता 94स्तोत्रसंहिता 96 ->