Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
60
शत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचना
स्तोत्र. 108:6-13
दाविदाचे स्तोत्र
1 हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस;
तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण.
2 तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर,
कारण ती हादरत आहे.
3 तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत;
तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे.
4 तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे,
यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
5 ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी,
म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
6 देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन;
मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
7 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे;
एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे;
यहूदा माझा राजदंड आहे.
8 मवाब माझे धुण्याचे पात्र आहे;
अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन;
मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9 मला बळकट नगरात कोण नेईल?
मला अदोमात कोण नेईल?
10 हे देवा, तू आम्हास नाकारले नाही?
परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
11 तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर,
कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
12 आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ;
तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.

<- स्तोत्रसंहिता 59स्तोत्रसंहिता 61 ->