Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
3
प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला.
1 परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत!
पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.
2 “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,”
असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत.
सेला
*अल्पविराम
3 परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस,
तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.
4 मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन,
आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल.
सेला
5 मी अंग टाकून झोपी गेलो;
मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
6 जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत,
त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.
7 हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार!
कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस,
तू दुष्टांचे दात पाडले आहेत.
8 तारण विजयपरमेश्वरापासूनच आहे,
तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो.
सेला.