Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
29
तुफानात परमेश्वराची वाणी
दाविदाचे स्तोत्र.
1 स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव
आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.
2 परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या;
पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
3 परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला,
गौरवशाली देव गर्जत आहे,
परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.
4 परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे,
परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.
5 परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते,
परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 तो लबानोनला वासराप्रमाणे आणि
सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.
7 परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.
8 परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
9 परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते
आणि अरण्य पर्णहीन करते.
पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
10 महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे,
आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो,
परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.

<- स्तोत्रसंहिता 28स्तोत्रसंहिता 30 ->