Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
27
1 उद्याविषयी बढाई मारू नकोस,
कारण एक दिवस काय घेऊन येईल हे तुला माहित नाही.
2 तुझ्या स्वतःच्या मुखाने नव्हे तर दुसऱ्याने तुझी स्तुती करावी,
तुझ्याच ओठांनी नव्हे तर परक्याने तुझी स्तुती करावी,
3 दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वजनाने भारी असते,
पण मुर्खाला डिवचणे या दोन्हीपेक्षा भारी असते.
4 क्रोधाचा क्रूरपणा आणि कोपाचा पूर
पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?
5 गुप्त प्रेमापेक्षा
उघड निषेध चांगला आहे.
6 मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत,
पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो.
7 जो कोणी पूर्ण तृप्त आहे त्यास मधाच्या पोळाचा कंटाळा येतो,
भुकेल्याला प्रत्येक कडू गोष्ट गोड आहे.
8 जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो,
तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो.
9 सुगंधी द्रव्य आणि सुवास हृदय आनंदीत करतात.
पण मित्राचा गोडपण त्याच्या सल्ल्यापेक्षा उत्तम आहे.
10 स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्रांना सोडू नकोस;
आणि आपल्या संकटाच्या दिवशी भावाच्या घरी जाऊ नको.
दूरवरच्या आपल्या भावाकडे जाण्यापेक्षा जवळचा शेजारी चांगला आहे.
11 माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे मन आनंदीत कर,
नंतर जो कोणी माझ्यावर टीका करेल त्यास मी उत्तर देईन.
12 शहाणा मनुष्य संकटाला पाहतो आणि स्वतःला लपवतो,
पण भोळेपुढे जातात आणि त्यांना त्याची किंमत द्यावी लागते.
13 जो परक्याच्या कर्जासाठी पैसे ठेवून
जामीन झाला आहे त्याचे वस्त्र ठेवून घे;
पण जेव्हा तो व्यभिचारी स्त्रीसाठी जामीन होतो त्यास तारणादाखल ठेव.
14 जो कोणी पहाटेस उठून आपल्या शेजाऱ्याला मोठ्या आवाजात आशीर्वाद देतो,
तो त्यास शाप असा गणला जाईल.
15 पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके,
भांडखोर पत्नी सारखीच आहेत.
16 तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे,
किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे.
17 लोखंड लोखंडाला धारदार करते;
तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा धारदार करतो.
18 जो कोणी अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल.
आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल.
19 जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते,
तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते.
20 मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही.
त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे [a]कधी तृप्त होत नाही.
21 रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे;
आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते.
22 जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले,
तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही.
23 तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर.
आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे.
24 संपत्ती कायम टिकत नाही.
मुकुट तरी सर्व पिढ्यानपिढ्या टिकेल काय?
25 गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते.
आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते.
26 वस्त्रासाठी कोकरे आहेत,
आणि बकरे शेताचे मोल आहेत.
27 बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी,
आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे.

<- नीतिसूत्रे 26नीतिसूत्रे 28 ->