2 त्याठिकाणी लोकांस पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले. 3 लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते.
4 “तू परमेश्वराच्या लोकांस या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असे तुला वाटते का? 5 तू आम्हास मिसर देशातून का आणलेस? तू आम्हास या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.” 6 म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.
7 परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला, 8 तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांस बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांस आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील. 9 मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली. 10 मोशे आणि अहरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? 11 मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली. 12 पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही. 13 त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
17 कृपाकरून आम्हास तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू.
18 परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु. 19 इस्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हास त्याचा मोबदला देऊ. आम्हास फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हास तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.
20 पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हास आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तीशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढावयास गेला. 21 अदोमाच्या राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलाचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले.
25 आता अहरोनाला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा. 26 अहरोनाचे खास कपडे त्याच्याकडून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्याच्या पूर्वजांकडे जाईल व मरेल.
27 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले. 28 मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले. 29 इस्राएलाच्या सर्व लोकांस अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला.
<- गणना 19गणना 21 ->