Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
4
परमेश्वराचा दिवस येत आहे
1 “कारण पाहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो, आणि सर्व गर्विष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, म्हणजे एकही फांदी किंवा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. 2 “परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल. 3 तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या तळपायाखाली राख होतील.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. 4 “मोशे जो माझा सेवक होता त्यास होरेबात सर्व इस्राएलासाठी जे नियमशास्त्र मी आज्ञापिले ते, म्हणजे नियम व न्यायही तुम्ही आठवा.” 5 “पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल. 6 आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.”

<- मलाखी 3