Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

मलाखी
लेखक
मलाखी 1:1 या पुस्तकाचा लेखक म्हणून मलाखी संदेष्टा याला ओळखते. इब्री भाषेत, हे नाव “संदेशवाहक” या शब्दावरून येते, जे देवाचे सेवक म्हणून देवाने मला दिलेल्या संदेशाचे वाचक म्हणून मलाखीच्या भूमिकेबद्दल सांगते. दुहेरी अर्थाने “मलाखी” हा संदेश आपल्याला आणत असलेला दूत आहे आणि त्याचा संदेश असा आहे की भविष्यात देव दुसऱ्या संदेशवाहकाला पाठवील, कारण महान संदेष्टा एलीया परमेश्वराच्या दिवसापूर्वी परतला होता.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 430.
हे एक बंदीवासानंतरचे पुस्तक आहे, म्हणजेच हे बाबेलमधील बंदिवासातून परतल्यानंतर लिहिले आहे.
प्राप्तकर्ता
यरूशलेममध्ये राहणाऱ्या यहूदी लोकांसाठी पत्र आणि सर्वत्र देवाच्या लोकांना सामान्य पत्र.
हेतू
देव त्याच्या लोकांना मदत करण्यासाठी सर्व गोष्टी करेल आणि लोकांना स्मरण करून देण्यास सांगतो की जेव्हा देव न्यायाधीशाच्या रूपात येतो तेव्हा देव त्यांना त्यांच्या वाईट गोष्टीसाठी जबाबदार धरेल, कराराचे आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी लोकांना त्यांच्या पापांचा पश्चात्ताप करण्यास उद्युक्त करणे. लोकांना देवाकडे परत जाण्यास सांगण्यासाठी मलाखीच्या माध्यमातून देवाने दिलेला हा इशारा होता. जसे की जुन्या कराराचे शेवटचे पुस्तक बंद होते, येणाऱ्या ख्रिस्ताद्वारे देवाच्या न्यायदंडांची घोषणा आणि त्याच्या पुनरुत्थानाचे आश्वासन इस्त्राएल लोकांच्या कानी ऐकू येत आहे.
विषय
औपचारिकता दटावली गेली.
रूपरेषा
1. याजकाला देवाचा आदर करण्यास प्रोत्साहित केले जाणे — 1:1-2:9
2. यहूदाला विश्वासूपणे प्रोत्साहित करण्यात येणे — 2:10-3:6
3. यहूदाला देवाकडे परत येण्यासाठी प्रोत्साहित केले जाणे — 3:7-4:6

1
परमेश्वराचे याकोबावरील प्रेम
1 परमेश्वराकडून मलाखीच्याहस्ते इस्राएलासाठी आलेल्या संदेशाची घोषणा.

2 परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.” पण तुम्ही म्हणालात, “कशावरून तू आमच्यावर प्रेम करतोस?” परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर? पण मी याकोबला निवडले. 3 आणि मी एसावचा स्वीकार केला नाही[a]. मी त्याच्या डोंगरी प्रदेशांचा नाश केला. एसावच्या देशाचा नाश झाला, आता तिथे फक्त रानटी कोल्हे राहतात.” 4 अदोम [b]असे म्हणाला, “आमचा नाश झाला आहे, तरी पण आम्ही परत जाऊन जे उध्वस्त झाले आहे ते बांधू.” पण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “ते बांधतील पण मी पाडून टाकीन.” आणि लोक त्यांना दुष्टांचा देश म्हणतील, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर परमेश्वर कायमचा रागावला आहे. 5 तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील आणि तू म्हणशील, “परमेश्वर इस्राएलाच्या सीमेपलीकडे थोर मानला जावो.”

परमेश्वर याजकांना खडसावतो
6 सेनाधीश परमेश्वर तुझ्याशी असे बोलतो, “मुले वडिलांना आणि सेवक आपल्या धन्याला मान देतो. मग मी, जो तुमचा पिता आहे, त्या माझा सन्मान कुठे आहे? आणि मी जर तुमचा धनी आहे, तर मग माझा परम आदर कुठे आहे? अहो याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही. पण तुम्ही म्हणता ‘तुझ्या नावाचा मान आम्ही कसा राखला नाही?’ 7 तुम्ही अशुद्ध भाकरी माझ्या वेदीवर अर्पण करता. आणि म्हणता, ‘कशामुळे आम्ही तुला विटाळवीले?’ परमेश्वराचा मेज तुच्छ आहे, असे बोलून तुम्ही ते विटाळवता.

8 ‘जेव्हा तुम्ही यज्ञ करण्यासाठी अंधळा पशू अर्पण करता, तेव्हा हे वाईट नाही काय? आणि जेव्हा तुम्ही लंगडा किंवा रोगीष्ट पशू अर्पण करता तेव्हा ते वाईट नाही काय? तू आपल्या अधिकाऱ्यासमोर हे सादर कर, तो हे स्वीकार करील का? अथवा तो तुझ्यावर अनुग्रह करेल का?’ ” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. 9 आणि आता तुम्ही देवा कडून अनुग्रह मागता, ह्यासाठी की तो आमच्यासाठी दयावान असेल. अशा अर्पणांसह तो तुमच्यातल्या एकाला तरी ग्रहण करेल काय? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. 10 “अहा! तुम्ही माझ्या वेदीवर अग्नी पेटवू नये म्हणून दारे बंद करील असा तुम्हामध्ये कोणी असता तर किती चांगले झाले असते! मी तुमच्या हातातले अर्पण स्विकारणार नाही, कारण तुम्हा विषयी मी आनंदी नाही,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. 11 “कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. 12 “परंतु परमेश्वराचा मेज विटाळलेला आहे, आणि त्याचे फळ व त्याचे अन्न तिरस्कारयुक्त आहे, असे म्हणण्याने तुम्ही ते अपवित्र केले आहे. 13 तुम्ही असेही म्हणता की, हे किती कंटाळवाणे आहे, आणि त्याविषयी तुम्ही तुच्छतेने कुरकुर करता,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही जे जुलमाने लुटून आणलेले किंवा लंगडे किंवा रोगी या प्रकारचे तुमचे अर्पण आणता; तर आता हे मी तुमच्या हातातून स्वीकार करावे काय? 14 तर जो कोणी आपल्या कळपात नर असतांना त्याचा नवस करतो आणि दोष असलेला पशू परमेश्वरास यज्ञ म्हणून अर्पण करतो तो फसवणारा शापित असो. कारण मी थोर राजा आहे आणि राष्ट्रे माझ्या नावाची भीती धरतात. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

मलाखी 2 ->