39
1 रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का?
हरीणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?
2 पहाडी बकरी आणि हरीणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का?
त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का?
3 ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात
आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात.
4 ती बछडी शेतात मोठी होतात.
नंतर ती सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत.
5 रानटी गाढवांना कोणी सोडून दिले?
त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले?
6 ज्याला मी वाळवंटात घर दिले,
मी त्यांना राहण्यासाठी क्षारभूमी दिली.
7 गजबजलेल्या शहरांना हसतात (त्याला शहरातला गजबजाट आवडत नाही)
आणि त्यांना कुठलाही मनुष्य आव घालू शकत नाही.
8 ते डोंगरात राहतात तेच त्यांचे कुरण आहे.
ते आपले अन्न तिथेच शोधतात.
9 रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का?
तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का?
10 दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय?
आणि तू त्यास तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?
11 तो खूप बलवान असतो त्याच्यावर तू भरवसा ठेवशील काय,
तू तुझे काम त्यांच्यानवर सोपवशील का?
12 तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल
आणि खळ्यात नेईल असा भरवसा तुला वाटतो का?
13 “शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते
परंतु तिला उडता येत नाही तिचे पंख आणि पिसे माया करायच्या कामी पडतात काय?
14 ती आपली अंडी जमिनीत घालते
आणि ती वाळूत उबदार होतात.
15 आपल्या अंड्यांवरुन कोणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते.
16 ती आपल्या पिलांना सोडून जाते ती जणू स्वत:ची नाहीतच असे ती वागते.
तिची पिल्ले मरण पावली तरी तिला त्याची पर्वा नसते काम निष्कळ झाल्याचे सुखदु:ख तिला नसते.
17 कारण मी देवाने तिला शहाणे केले नाही. आणि मीच तिला समज दिली नाही.
18 परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते
तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते,
19 तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का?
तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का?
20 तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का?
तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात.
21 तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो.
तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
22 तो भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही
तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही.
23 सैनिकाचा भाता त्याच्या बाजूला हलत असतो
त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात.
24 तो फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो
तो जेव्हा रणशिंग फुंकलेले ऐकतो तेव्हा तो एका स्थळी स्थिर राहू शकत नाही.
25 रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो.
त्यास दुरुनही लढाईचा वास येतो.
सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्यास ऐकू येतात.
26 तू ज्ञानाने तू ससाण्याला पंख पसरुन
दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का?
27 आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का?
तूच त्यास त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का?
28 तो उंच सुळक्यावर राहतो
तीच त्याची तटबंदी आहे
29 त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो.
गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते.
30 जेथे लोक मरण पावलेले असतात