Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

1 अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला,

2 “तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय?
मी देवापेक्षा अधीक नितीमान आहे असा तू विचार करतोस काय?
3 तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल?
मी जर पाप केले नाहीतर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
4 मी तुला उत्तर देतो,
तू आणि तुझे मित्र यांना देखील.
5 वरती आकाशाकडे बघ,
तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या ढगांकडे बघ.
6 जर तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही?
तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही?
7 आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस?
तुझ्याहातून त्यास काहीच मिळत नाही?
8 तुझे दुष्टपण कदाचित मनुष्यास ईजा पोहचवेल, जसा तू मनुष्य आहेस,
आणि तुझे नितीमत्वाचा कदाचीत एखाद्या मनुष्याच्या पुत्राला लाभ होईल.
9 पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांस दु:ख झाले तर ते ओरडतील.
ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
10 परंतु कोणीही असे म्हणणार नाहीत, मला निर्माण करणारा देव कुठे आहे?
जो रात्रीला गीत देतो,
11 ‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’
पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो,
12 त्यामुळे त्यांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही
कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत.
13 देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही
सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
14 तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही
तर तू त्याची वाट पाहत रहा!
15 तो तुला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही,
आणि तो लोकांच्या गर्वीष्ठपणाकडे फारसे लक्ष देत नाही.
16 म्हणून ईयोब मुर्खपणाचे बोलण्यासाठी त्याचे मुख उघडतो.
तो ज्ञानाविना त्याचे शब्द बोलत राहतो.”

<- ईयोब 34ईयोब 36 ->