26
ईयोब देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतो
1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 “बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले,
शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले.
3 बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास,
आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले.
4 तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास?
तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले.
5 बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.
6 देवापुढे अधोलोक नग्न आहे,
त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकून घेवू शकत नाही.
7 त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे,
आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
8 तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो,
तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही.
9 तो चंद्राचा चेहरा झाकतो
आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.
10 त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली
आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.
11 त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात
आणि भयचकीत होतात.
12 तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो,
तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो.
13 त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो
त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
14 पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे,
किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो!