Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
6
यरूशलेम व यहूदा ह्यांचा ऱ्हास
1 बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरूशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका.
बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
2 सियोनेची कन्या, जी सुंदर आणि नाजूक अशी आहे, तिचा मी नाश करणार आहे.
3 मेंढपाळ आणि त्यांचे कळप तिच्याकडे जातील.
ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतील. प्रत्येक मनुष्य स्वत:च्या हाताने कळपाची काळजी घेतील.
4 “परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा! आपण दुपारी हल्ला करु.
हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहेत.
5 तर आपण रात्रीच तिच्यावर हल्ला करु या व तिच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.”
6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, शक्तीमान परमेश्वर असे म्हणतो, “झाडे कापा आणि यरूशलेमविरूद्ध मोर्चा बांधा.
या नगरीला शिक्षा व्हावीच, कारण या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.
7 जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच ही नगरी आपला दुष्टपणा ताजा ठेवते.
तिच्यामध्ये लूटमार व हिंसाचार हे ऐकू येतात. पीडा आणि दु: ख सदोदीत माझ्या समोर आहे.
8 यरूशलेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन,
आणि तुला ओसाड असे करीन, जेथे कोणीही राहू शकणार नाही.”
9 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “ते इस्राएलाचे शेष उरलेल्या द्राक्षांसारखे वेचून काढतील, तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे डाहाळ्यातून फिरव.”
10 मी कोणाला घोषीत करू आणि चेतावणी देऊ, जेणेकरून ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुंता आहे म्हणून त्यांना ऐकू येत नाही.
पाहा, परमेश्वराचे वचन त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या जवळ आले आहे, पण त्यांना ते नको आहे.
11 म्हणून मी परमेश्वराच्या रागाने भरलो आहे. “तो आतल्या आत दाबून धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर, एकत्र जमलेल्या तरुणांवर परमेश्वराचा राग ओतणार आहे.
पुरुष व त्याची पत्नी असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील.
12 त्यांची घरे दुसऱ्यांना दिली जातील त्यांची शेते व त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना दिल्या जातील.
मी माझा हात उगारून देशातील रहिवाश्यांवर हल्ला करीन,” असे परमेश्वर म्हणतो.
13 “कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात.
भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.
14 आणि शांती नसता, शांती, शांती, असे म्हणून त्यांनी माझ्या लोकांची जखम वरवर बरी केली आहे.
15 त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते लाजले का? त्यांना काही लाज वाटली नाही आणि त्यांनी पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. त्यांना कोणत्याही अपमानास्पद वागणूकीचा अनुभव घेतला नाही.
यास्तव मी ज्यावेळी त्यांना शिक्षा करीन तेव्हा ते पडणाऱ्यांबरोबर पडतील. ते उध्वस्त केले जातील.” परमेश्वर असे म्हणतो.
16 परमेश्वर असे म्हणतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुना रस्ता कोणता ते विचारा.
चांगल्या रस्त्याची चौकशी करा, नंतर त्याच चाला आणि तुमच्या जीवा करता विसाव्याची जागा शोधा.”
पण तुम्ही लोक म्हणाला, आम्ही जाणार नाही.
17 रणशिंगाचा आवाज ऐकायला तुमच्यावर मी रखवालदार नियूक्त केले.
पण ते म्हणाले, आम्ही ऐकणार नाही.
18 यास्तव राष्ट्रांनो, ऐका! पाहा, त्यांच्यासोबत काय होईल, याचे तुम्ही साक्षीदार आहात.
19 हे पृथ्वी, ऐक! पाहा, या लोकांवर मी अनर्थ आणणार आहे, म्हणजे त्यांच्याच विचारांचे फळ त्यांच्यावर आणीन.
कारण त्यांनी माझ्या वचनांकडे दुर्लक्ष केलेच, पण ह्याव्यतीरिक्त ते धिक्कारले आहे.
20 परमेश्वर म्हणतो, “शेबाहून धूप आणि दूरवरच्या देशातून गोड सुगंध माझ्या काय कामाचा?
तुमची होमार्पणे आणि यज्ञ मला मान्य नाहीत.”
21 यास्तव परमेश्वर असे म्हणतो: “मी या लोकांविरूद्ध अडखळणे ठेवीन. त्यावर वडील व मुले अडखळून पडतील. राहणारे आणि शेजारी हे नष्ट होतील.”
22 परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून लोक येत आहे.
पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.
23 ते धनुष्य आणि भाला उचलतील. ते क्रूर आहेत आणि ते दया करीत नाही. त्यांचा आवाज समुद्राच्या गर्जने सारखा आहे.
आणि हे सियोन कन्ये, लढाईसाठी सिद्ध झालेल्या पुरूषांप्रमाणे विशिष्ट रचना करूण ते घोड्यांवरून स्वारी करतात.”
24 त्यांच्याबद्दल आम्ही बातमी ऐकली आहे. दुःखात आमचे हात कोलमडले आहेत. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे.
25 बाहेर शेतात जाऊ नका आणि रस्त्यावर चालू नका.
कारण शत्रूची तलवारी आणि धोका सगळीकडे आहे.
26 माझ्या लोकांच्या कन्ये, शोकवस्त्रे घाल आणि राखेत लोळ, एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत कर.
कारण नाश करणारा अगदी एकाएक आपल्यावर येईल.
27 “यिर्मया, मी तुला पारखणारा असे केले आहे. म्हणजे तू त्यांच्या मार्ग तपासावा आणि पारखून पाहावा.
28 ते सर्व लोक दुराग्रही आहेत. जे दुसऱ्यांची निंदा करतात.
ते सर्व कास्य व लोखंड आहेत, जे भ्रष्टपणे वागतात.
29 भाता जळाला आहे, अग्नीतून शिसे जळून निघाले आहे,
ते स्वत:ला व्यर्थच गाळीत राहतात, कारण जे दुष्ट ते काढून टाकलेले नाहीत.
30 त्यांना ‘टाकाऊ चांदी’ असे म्हटले जाईल. कारण परमेश्वराने त्यांना नाकारले आहे.”

<- यिर्मया 5यिर्मया 7 ->