1 काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत:शी म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन” परंतु तिच्या पित्याने त्यास आत जाऊ दिले नाही. 2 तिचा पिता म्हणाला, “मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतोस, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली; तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, आहे की नाही? तिच्याऐवजी तिला घे.” 3 तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “या वेळेस मी पलिष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबंधी मी निर्दोष राहीन.” 4 शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या. 5 मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिके आणि धान्याच्या रचलेल्या सुड्यांसह जाळली आणि त्याबरोबर जैतूनाचे मळेही जाळले. 6 तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” नंतर त्यांनी म्हटले, “तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले. 7 शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे केले, तरी त्याचा मी तुमच्याविरुध्द सूड घेईन, आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन.” 8 नंतर त्याने त्यांना मांडीवर व कंबरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला.