Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
27
इस्राएलाची मुक्तता व एकत्रीकरण
1 त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील.
2 तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील.
3 “मी परमेश्वर, तिची नीगा राखणारा, मी प्रत्येक क्षणी तिला पाणी घातले;
त्यामुळे कोणीही तिला दुखावणार नाही, म्हणून मी रात्र दिवस तिचे राखण करतो.
4 मी रागवलेलो नाही, लढाईत माझ्यापुढे काट्यांची झाडे व काटेरी झाडे कोण ठेवील!
पण युध्दात मी त्याच्या विरूद्ध चाल करून जाईल आणि मी त्यास जाळून नष्ट करून टाकीन.
5 अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे, त्याने माझ्याशी शांती प्रस्थापीत करावी.
6 येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्राएल उमलेले व त्यास नवीन पालवी फुटेल,
आणि ते जगाची पाठ फळांनी भरतील.”
7 काय परमेश्वराने याकोबावर आणि इस्राएलावर हल्ला केला, जसा त्याने त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर हल्ला केला? अथवा यांनी ज्यांचा वध केला आहे त्यांच्या वधाप्रमाणे यांचा वध करण्यात आला आहे काय?
8 याचप्रकारे तुम्ही याकोब आणि इस्राएलाला दूर *बंदिवासातपाठवून अचूक मापदंडांनीअचूक मापदंडांनी त्यांचा विरोध केला आहे. पुर्वेच्या वाऱ्याच्या दिवशी त्यांना तो प्रचंड वाऱ्याने दूर करतो.
9 याकरीता याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल, आणि त्याचे पाप दूर करण्याचे फळ हेच आहे.
तो वेदीचे सर्व दगड खडूच्या चूर्ण केलेल्या चुनखड्यासारखे करेल,
आणि तसेच अशेरा देवीचे खांब किंवा धूप वेदीही उभ्या राहणार नाहीत.
10 कारण तटबंदी असलेले शहर नाश झाले आहे आणि वस्ती असलेले राणासारखी सोडून दिलेली आहे.
वासरू तेथे चरेल आणि तेथे बसेल आणि त्याच्या फांद्या खाऊन टाकेल.
11 त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील.
कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव
ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही.
12 त्या दिवशी असे होईल की,
परमेश्वर फरात नदीपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या आपल्या पिकाची मळणी करील,
आणि तुम्ही इस्राएलच्या लोकांनो एकत्र गोळा केले जाणार.
13 त्या दिवशी मोठा कर्णा वाजेल,
आणि तेव्हा अश्शूर देशामध्ये नाश होणारे आणि मिसर देशात जे घालवले आहेत ते येतील.
आणि यरूशलेमेस पवित्र पर्वतावर परमेश्वरास पुजतील.

<- यशया 26यशया 28 ->