11
इशायाच्या बुंध्याची सात्त्विक कारकीर्द
यश. 9:1-7
1 इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल, व त्याच्या मुळातून निघालेल्या शाखेला फळ येईल.
2 परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर येईल,
3 परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल;
त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही.
4 याउलट तो दीनांचा न्याय चांगुलपणाने करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील.
तो आपल्या मुख दंडाने पृथ्वीला तडाखा देईल. आणि फुंकराने दुष्टांना ठार करील.
5 धार्मिकता त्याचा कमरबंद असेल, आणि विश्वास त्याचा कमरवेष्टन होईल.
6 लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल.
वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील.
7 गाय व अस्वल एकत्र चरतील, आणि त्यांचे बच्चे एकत्र लोळतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.
8 तान्हे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल
आणि दुधपीते बालक सापाच्या बिळात आपला हात घालील.
9 माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत;
कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.
10 त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल.
राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल.
अवशेषांचे विजयी परतणे
11 त्यादिवशी, असे होईल की प्रभू आपल्या अश्शूर, मिसर, पथ्रोस,
कूश, एलाम, शिनार, हमाथ व भूसमुद्रातील त्याच्या उर्वरीत लोकांस परत मिळविण्यासाठी आपले हात लांब करील.
12 तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील व इस्राएलातून बहिष्कृत केलेल्या
आणि यहूदातील विखुरलेल्यांस पृथ्वीच्या चारही दिशांकडून एकत्र करील.
13 तो एफ्राइमाचे वैर संपवेल, आणि यहूदाचे जे विरोधी त्यांचा बिमोड करेल.
एफ्राइम यहूदाचा द्वेष करणार नाही, आणि यहूदा एफ्रइमाशी विरोध करणार नाही.
14 याउलट ते पश्चिमेकडील पलिष्ट्यांच्या टेकड्यांवर झडप घालतील, आणि एकत्रितपणे पूर्वेकडील लोकांस लुटतील.
अदोम व मवाब यांच्यावर ते हमला करतील आणि अम्मोनाचे लोक त्यांच्या आज्ञा पाळतील.
15 परमेश्वर मिसराच्या समुद्राची खाडी दुभागील. आपल्या उष्ण श्वासाने फरात नदीवर आपला हात चालवील,
आणि जोडे घालून तिला ओलांडता येईल अशा रीतीने तिला सात फाटयांमध्ये विभागील.
16 इस्राएल मिसर देशातून वर आला,