Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
6
इस्त्राएलाच्या पश्चात्तापाचा खोटेपणा
1 “चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ,
कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील,
त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.
2 दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल,
तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल,
आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.
3 चला आपण परमेश्वरास ओळखू या,
प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया,
तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे,
भूमीवर पाऊस पडतो,
त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
4 एफ्राईमा मी तुला काय करु?
यहूदा मी तुला काय करु?
तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे,
आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे.
5 म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे,
माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे.
तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे.
6 कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो,
मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.
7 आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला,
ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले.
8 गिलाद हे दुष्टांचे शहर आहे,
त्यावर रक्ताची पाऊले उमटली आहे.
9 जशी लुटारुंची टोळी टपून बसते,
तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात,
त्यांनी महापातके केली आहेत.
10 इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे,
एफ्राईमाचा व्यभिचार तेथे आहे, आणि इस्राएल प्रदुषित झाला आहे.
11 तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल,
तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करीन.

<- होशेय 5होशेय 7 ->