Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
12
लबाडी व छळ ह्यांबद्दल एफ्राइमाचा निषेध
1 एफ्राईम वारा जोपासतो,
आणि पूर्वेच्या वाऱ्याचा पाठलाग करतो,
तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो,
तो अश्शूरांशी करार करतो,
आणि मिसरात जैतूनाचे तोल घेऊन जातो.
2 परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे.
आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील.
त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.
3 गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली,
आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.
4 त्या स्वर्गदूताशी झोंबी केली, आणि जिंकला,
त्याने रडून देवाची करुणा भाकली,
तो बेथेलास देवाला भेटला,
देव तेथे त्याच्याबरोबर बोलला.
5 हा परमेश्वर, सेनेचा देव
ज्यांचे स्मरण ‘परमेश्वर’ नावाने होते.
6 म्हणून तू आपल्या देवाकडे वळ,
विश्वासू आणि न्यायी राहून त्याचा करार पाळ,
आणि तुझ्या देवाची निरंतर वाट पहा.
7 व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहेत,
फसवेगिरी करण्याची त्यांना आवड आहे.
8 एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे,
माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे.
माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही,
ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”
9 मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे,
नेमलेल्या सणाच्या दिवसाप्रमाणे
मी तुला पुन्हा तंबूत वसविणार.
10 मी संदेष्टयांशी देखील बोललो आहे.
आणि त्यांना मी पुष्कळ दृष्टांत दिले आहेत,
मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.
11 जर गिलादामध्ये दुष्टता असली
तर निश्चितच लोक नालायक आहेत.
गिलादात ते बैल अर्पण करतात,
त्यांच्या वेद्यांची संख्या शेतातील तासामध्ये असलेल्या दगडाएवढी आहे.
12 याकोब अरामाच्या मैदानात पळून गेला.
इस्राएलाने पत्नीसाठी चाकरी केली
आपल्या पत्नीसाठी मेंढरे राखली.
13 परमेश्वराने एका संदेष्ट्याद्वारे मिसरातून इस्राएलास बाहेर काढले,
आणि संदेष्ट्याद्वारेच त्यांची काळजी घेतली.
14 एफ्राईमाने परमेश्वराचा क्रोध अत्यंत चेतवला आहे.
म्हणून त्याचा धनी त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्यावर आणिल
आणि त्याच्या लज्जास्पद कामाची त्यास परतफेड करील.

<- होशेय 11होशेय 13 ->