Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
11
आपल्या स्वच्छंदी लोकांबद्दल देवाचा कळवळा
1 जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले,
आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले.
2 त्यांना जेवढे बोलविले तेवढे
ते माझ्यापासून दूर जात
ते बआलास बली
आणि मुर्तीस धूप जाळत.
3 तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले
तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले
पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.
4 मी त्यांना मानवता
आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो
मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो
आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.
5 ते मिसरात परत येणार काय?
अश्शूर त्यावर राज्य करणार काय?
कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?
6 त्यांच्या नगरावर तलवार चालेल
आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील,
त्यांचा नाश त्यांच्या स्वत:च्या योजनांमुळे होईल.
7 माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे
तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे
त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.
8 हे एफ्राईमे,
मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला,
मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ?
मी तुला अदमासारखे कसे करु?
मी तुला सबोयिमासारखे कसे करु?
माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
9 मी माझा भयानक राग अमलात
आणणार नाही मी एफ्राईमाचा पुन्हा नाश करणार
नाही कारण मी देव आहे
आणि मनुष्य नाही
तुमच्यामध्ये असणारा
मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही.
10 ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर
सिंहासारखी गर्जना करेन
मी खरोखर गर्जेन
आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.
11 ते मिसरातून पक्षासारखे
आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील
मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.
12 एफ्राईम मला लबाडीने
आणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले,
पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर,
जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.

<- होशेय 10होशेय 12 ->