Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
10
1 इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे.
त्यास विपुल फळे येतात.
जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या.
त्याची भूमी सुपीक झाली,
तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.
2 त्यांचे हृदय कपटी आहे,
त्यांना त्यांची शिक्षा होईल
परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल
त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल.
3 आता ते म्हणतील,
“आम्हास राजा नाही,
कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही
आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”
4 ते पोकळ शब्द बोलतात
खोट्या शपथा वाहून करार करतात,
म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात
तसा त्यांच्यावर न्याय येईल.
5 शोमरोनाचे रहिवासी
बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील
त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील,
सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी
जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते
आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.
6 ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील.
एफ्राईम लज्जीत होईल,
आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे
इस्राएल लज्जीत होईल.
7 शोमरोनाचा राजा पाण्यावर
तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल.
8 दुष्टतेची श्रध्दास्थानाने
आणि इस्राएलाची पापे नाश पावतील
त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील.
लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका”
आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा”
9 इस्राएला,
गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस;
तू तिथेच राहिला आहेस
गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत?
10 मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन,
त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील
व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील.
11 एफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे
तिला मळणी करायला आवडते म्हणून
मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन.
मी एफ्राईमावर जू ठेवीन,
यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील.
12 तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा
आणि कराराच्या विश्वासूपणाची
फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरुन काढा,
कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही,
तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे.
13 तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली,
तुम्ही अन्यायाची कापणी केली,
तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले
कारण तू तुझ्या योजनांवर
आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.
14 म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल
आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील.
हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला
तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.
15 तुझ्या अती
दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील.
प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील.

<- होशेय 9होशेय 11 ->