Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
6
इस्त्राएलाच्या पर्वतांविषयी भविष्य
1 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, आणि तो मला म्हणाला, 2 मानवाच्या मुला, आपले मुख इस्राएलाच्या पर्वताच्या विरुध्द राहून त्यांच्या विरुध्द भाकीत कर 3 परमेश्वर देवाचा शब्द ऐका! असे इस्राएलाच्या पर्वताला जाऊन सांग, देव त्या पर्वत, दऱ्याखोऱ्यांना, झऱ्यांना सांगत आहे; ऐका! मी तुमच्या विरुध्द तलवार चालवीन, आणि मी तुमचे उच्चस्थान उध्वस्त करील. 4 तुमच्या वेद्याचे खांब, तुमच्या सूर्यमूर्ती मी पाडून टाकीन, तुमचे वध पावलेले लोक तुमच्या मूर्त्यांपुढे पडतील असे परमेश्वर करीन. 5 इस्राएल लोकांचे प्रेत त्यांच्या मूर्त्यांपुढे मी टाकून देईन आणि त्यांच्या वेद्यांपुढे हाडांची पांगापांग करेन. 6 जेथे तुम्ही राहता त्या शहराच्या उच्च स्थानांचा विध्वंस करेन. म्हणून तुमच्या वेद्या, मुर्त्या, उध्वस्त केल्या जातील. त्यामुळे ते मोडकळीस येतील आणि त्यांची सर्व कामे पुसून टाकली जातील. 7 त्यांच्या मध्ये ते मृतप्राय होतील आणि मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे. 8 तरी उरलेल्यांचा मी बचाव करेन, देशातून काहींचा बचाव तलवारीपासून होईल, जेव्हा देशातून तुमची पांगापांग होईल. 9 ज्यांचा बचाव झाला ते माझ्या बद्दल विचार करतील जेथे ते गुलामगिरीत होते. त्यांचे मन दुराचारी झालेले, माझ्या पासून दूर आहेत, मग तीव्र तिटकारा त्यांच्या चेहऱ्यावर व डोळे मूर्तीकडे लागलेले, दुष्टपणा, घृणा त्यांची निंदा झाली होती. 10 तेव्हा त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे, त्यांच्यावर संकट आणले त्यासाठी विशेष त्यांचे कारण आहे. 11 परमेश्वर देव हे म्हणतो; “टाळ्या वाजव आपले पाय आपट, अहा! कारण इस्राएलाच्या घराण्यात सर्व प्रकारचे वाईट घृणा आहेत. त्यांच्यावर तलवार, दुष्काळ, साथीचा रोग येईल. 12 जे लांब असतील ते साथीच्या रोगाने मरतील जे जवळ असतील ते तलवारीने मरतील, उरलेले लोक दुष्काळाने मरतील; मी त्यांच्या विरुध्द असलेला संताप पूर्ण करेन. 13 मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा त्यांचे मस्तक त्यांच्या वेद्यांपुढे उच्च ठिकाणी ओक झाडा शेजारी, हिरव्या छाये खाली पडलेले असतील, जेथे ते मुर्त्यांना सुगंधी द्रव्य अर्पण करीत होते! 14 मी आपले सामर्थ्य त्यांना दाखवीन, आणि त्यांच्या भूमीचा पूर्ण विध्वंस करेन, त्यांचे राहण्याची ठिकाणे दिबलायाकडे व ज्या जागी ते राहत होते जवळपास सर्व ठिकाणे वाया घालवीन, मग त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे.”

<- यहेज्केल 5यहेज्केल 7 ->