Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

1 “मग मानवाच्या मुला, स्वतःसाठी न्हाव्याच्या वस्तऱ्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर 2 वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील तिसरा भाग शहराच्या मध्य भागी जाळून टाक. आणि तिसरा भाग तलवारीने कापून टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तलवार करेल. 3 थोडेसे केस कापून आपल्या कपड्याला बांधून टाक. 4 काही अजून केस घेऊन आगीत टाकून दे, आणि त्यास जाळून टाक, म्हणजे इस्राएलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल. 5 परमेश्वर देव म्हणतो, ही यरूशलेम नगरी, जी इतर राष्ट्रांमध्ये आहे, जेथे मी तिला स्थापीले, आणि मी तिला इतर देशांनी आजूबाजुने वेढीले आहे. 6 पण तिने वाईट आचरण करून इतर देशांहून माझा धिक्कार केला आहे, आणि त्यांनी माझ्या न्यायीपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे. 7 म्हणून परमेश्वर देव असे सांगतो; तुम्ही आजूबाजुच्या देशांपेक्षा अधिक त्रासदायक आहात. तुम्ही सभोवतालच्या देशाहून अधिक माझ्या फर्मानाचे पालन केले नाही. 8 म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेन! तुम्हास केलेले शासन हे आजूबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल. 9 तुझ्या किळस आणणाऱ्या कार्यामुळे, मी आजवर केले नाही, आणि करणार नाही, असे मी तुझ्यासोबत करेल. 10 तथापि बाप मुलांना, आणि मुले बापाला खाऊन टाकतील, कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे. तुमच्या उरलेल्या अंशाला चारही भागात फेकून देईल. 11 म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही. 12 घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील. 13 तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल, व माझा क्रोध शांत होईल असे त्यांना कळून येईल, परमेश्वर देव हे सर्व त्याच्या विरोधात आवेशाने म्हणाला. 14 तुझ्या आजूबाजुच्या देशांमध्ये तुझा नाश व तुझी खरडपट्टी काढेन, जे तुझ्या आजूबाजूने येणारे जाणारे ते पहातील. 15 यरुशलेच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावनीचा इशारा असेल. त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल. त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे परमेश्वर देव म्हणतो. 16 तुमच्यात कडूपणाचे बाण पाठवेन, त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेन; 17 दुष्काळ, रोगराई तुमच्यावर पाठवीन, तुम्ही आपत्यहीन व्हाल, साथीचा रोग, रक्तस्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन. असे परमेश्वर देव म्हणतो.”

<- यहेज्केल 4यहेज्केल 6 ->