1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली. 2 त्याने तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवली, ती अंगचीच होती, त्याने ती पितळेने मढविली. 3 त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली. 4 त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली, ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली. 5 त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या; 6 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढवले. 7 वेदी उचलून नेण्याकरता तिच्या बाजूच्या कड्यांत त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूंना फळ्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.
9 त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती. 10 तिला वीस खांब असून त्या खांबासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. 11 अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती व तिच्यासाठीही वीस पितळी उथळ्या असलेल्या वीस खांबावर ती आधारलेली होती; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. 12 अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याही होत्या; या खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; 13 पूर्वेकडील बाजू पन्नास हात लांब होती; 14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात होती; तिच्यासाठी तीन खांब व तीन उथळ्या होत्या; 15 आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या या बाजूला व त्या बाजूला पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याही तीन तीन होत्या. 16 अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते. 17 खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते. 18 अंगणाच्या फाटकाचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर वेलबुट्टीदार विणकाम केलेले होते; तो वीस हात लांब व पाच हात उंच होता; ही उंची अंगणाच्या पडद्या इतकी पाच हात असावी. 19 तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर आधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती. 20 निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.