Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
10
मर्दखयाची महती

1 मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला. 2 त्याची सामर्थ्याची व पराक्रमाची जी कृत्ये, त्यांची आणि मर्दखयाचे महत्व, राजाने ज्यांना थोर केले ते पारस आणि माद्य राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिले आहेत.

3 राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहूदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहूदी बांधव त्यास फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे.