Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

उपदेशक
लेखक
उपदेशक हे पुस्तक प्रत्यक्ष त्याच्या लेखकाची ओळख देत नाही. लेखकाने स्वतःला उपदेशक 1:1 मध्ये हिब्रू शब्द कोहेलेथ म्हणून ओळखले, ज्याचा अर्थ “प्रचारक” असा होतो. उपदेशक स्वतःला यरूशलेमेचा “राजा दाविदाच्या पुत्राच्या रुपात बोलावले,” ज्याने “माझ्याआधी यरूशलेममध्ये राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा शहाणपणात वाढ केली आहे,” आणि ज्याने अनेक नीतिसूत्रे एकत्रित केली आहेत (उपदेशक 1:1, 16; 12:9). शलमोनाने यरूशलेमेच्या राज्यारोहणानुसार दावीदाचा एकुलता एक पुत्र म्हणून जन्म घेतला ज्याने त्या शहरातील सर्व इस्त्राएलांवर राज्य करावे (1:12). येथे काही वचने आहेत जी सूचित करतात की शलमोनाने हे पुस्तक लिहिले. या संदर्भात काही संकेत आहेत की शलमोनाच्या मृत्यूनंतर एका वेगळ्या व्यक्तीने पुस्तक लिहीले असे सुचवले आहे, कदाचित शंभर वर्षांनंतर.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 940 - 931.
उपदेशकाचे पुस्तक शलमोनाच्या कारकिर्दीच्या दिशेने लिहिले असावे जे यरूशलेममध्ये लिहिले आहे असे दिसते.
प्राप्तकर्ता
उपदेशक प्राचीन इस्त्राएली लोकांसाठी आणि नंतर सर्व पवित्र शास्त्र वाचकांसाठी लिहिण्यात आले होते.
हेतू
हे पुस्तक आपल्यासाठी पूर्णपणे चेतावणी म्हणून आहे. जीवन केंद्रित न करता जगलो आणि देवाचे भय व्यर्थ, निष्फळ आणि वाऱ्याचा पाठलाग करणे आहे. आपण आनंद, संपत्ती, सर्जनशील क्रिया, शहाणपणा किंवा लहानसहान आनंदाचे अनुसरण करत असलो तरीही, आपण जीवनाच्या समाप्तीपर्यंत पोहोचू आणि आमचे जीवन व्यर्थ होते हे शोधून काढू. जीवनातील अर्थ केवळ देवावर केंद्रित केलेल्या जीवनातून येतो.
विषय
परमेश्वराला सोडून सर्व काही व्यर्थ आहे
रूपरेषा
1. प्रस्तावना — 1:1-11
2. जीवनाच्या विविध पैलूंवरील निरर्थक गोष्टी — 1:12-5:7
3. देवाचे भय — 5:8-12:8
4. अंतिम निष्कर्ष — 12:9-14

1
सर्वकाही व्यर्थ
1 राजे 4:20-28

1 ही शिक्षकाकडून आलेली वचने आहेत, जो यरूशलेमेतील राजा आणि दावीदाचा वंशज होता. 2 शिक्षक हे म्हणतो,

धुक्याच्या वाफेसारखी,
वाऱ्यातील झुळूकेसारखी
प्रत्येक गोष्ट नाहीशी होईल, पुष्कळ प्रश्न मागे ठेवून जातील.
3 भूतलावर मानवजात जे सर्व कष्ट करते त्यापासून त्यास काय लाभ?
4 एक पिढी जाते,
आणि दुसरी पिढी येते,
परंतु पृथ्वीच काय ती सर्वकाळ राहते.
5 सूर्य उगवतो
आणि तो मावळतो.
आणि जेथे तो उगवतो तेथे आपल्या स्थानाकडे पुन्हा त्वरेने मागे जातो.
6 वारा दक्षिणेकडे वाहतो
आणि उत्तरेकडे वळतो,
नेहमी त्याच्यामार्गाने सभोवती जाऊन फिरून
आणि पुन्हा माघारी येतो.
7 सर्व नद्या सागरात जाऊन मिळतात
पण सागर कधीही भरून जात नाही.
ज्या स्थानाकडून नद्या वाहत येतात,
तेथेच त्या पुन्हा जातात.
8 सर्व गोष्टी कष्टमय आहेत.
आणि कोणीही त्याचे स्पष्टीकरण करू शकत नाही.
डोळे जे काय पाहतात त्याने त्यांचे समाधान होत नाही,
किंवा जे काय कानाने ऐकतो त्यानेही त्यांची पूर्तता होत नाही. 9 जे काही आहे तेच होणार,
आणि जे केले आहे तेच केले जाईल.
भूतलावर काहीच नवे नाही.
10 कोणतीही अशी गोष्ट आहे का ज्याविषयी असे म्हणता येईल,
पाहा, हे नवीन आहे?
जे काही अस्तित्वात आहे ते फार काळापूर्वी अस्तित्वात होते,
आम्हांपूर्वीच्या युगामध्ये आधीच ते आले आहे.
11 प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी कोणाच्या लक्षात राहत नाहीत.
आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडणार
आणि भविष्यात ज्या गोष्टी घडतील
त्यादेखील आठवणीत राहणार नाही.
उपदेशकाचा अनुभव
12 मी शिक्षक आहे, आणि यरूशलेमेमध्ये इस्राएलावर राजा होतो. 13 आकाशाखाली जे सर्वकाही करतात त्याचा मी ज्ञानाने अभ्यास केला आणि त्यांचा शोध घेण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मनुष्यांच्या पुत्रामागे त्याचा शोध घेण्याचे बिकट कष्ट लावून दिले आहेत. 14 भूतलावर जी काही कामे चालतात ती मी पाहिली आणि पाहा, ते सर्व वायफळ आहेत आणि वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे ते आहे.
15 जे वाकडे आहे ते सरळ करू शकत नाही!
जे गमावले आहे ते जमेस धरू शकत नाही!

16 मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधी ज्या राजांनी यरूशलेमेवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. माझ्या मनाने महान ज्ञान व विद्या यांचा अनुभव घेतला आहे.” 17 याकरिता ज्ञान समजायला आणि वेडेपण व मूर्खपण जाणायला मी आपले मन लावले, मग हेही वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे आहे असे मी समजलो. 18 कारण विपुल ज्ञानात अधिक खेद आहे आणि जो कोणी ज्ञानात वाढतो तो दुःख वाढवतो.

उपदेशक 2 ->