1 धन्यांनो, तुम्हांसही स्वर्गात धनी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.
5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. 6 तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.
10 माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.) 11 युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. 12 ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे रहावे. 13 तुम्हासाठी व जे लावदीकियात व हेरापलीत आहेत त्याच्यांसाठी तो फार श्रम करीत आहे, अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो. 14 प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. 15 लावदीकियातील बंधू आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम द्या. 16 हे पत्र तुमच्यांत वाचून झाल्यावर की, लावदीकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावदीकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे. 17 अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे.
18 मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.
<- कलस्सैकरांस पत्र 3