Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

आमोस
लेखक
आमोस 1:1 नुसार या पुस्तकाचा लेखक संदेष्टा अमोस आहे. आमोस संदेष्टा तकोवातील मेंढपाळांच्या एका गटात राहिला. आमोसने त्याच्या लिखाणामध्ये स्पष्टपणे स्पष्ट केले की तो संदेष्ट्यांच्या कुटुंबातून आला नाही आणि त्याने स्वतःला त्यांच्यापैकी समजले नाही. देवाने टोळाद्वारे आणि अग्नीद्वारे न्यायदंड बजावला, परंतु आमोसच्या प्रार्थनेने इस्त्राएलांना वाचवले.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 760 - 750.
उत्तरेकडील इस्त्राएलच्या राज्यांत आमोसने बेथेल आणि शोमरोनहून प्रचार केला.
प्राप्तकर्ता
आमोसचे मूळ श्रोते इस्त्राएलचे उत्तरेकडील राज्य आणि पवित्र शास्त्राचे भविष्य वाचक होते.
हेतू
देव गर्वाचा द्वेष करतो. लोक असा विश्वास करीत होते की ते स्वयंपूर्ण होते आणि ते देवापासून आल्या होत्या त्या सर्व गोष्टी विसरले होते. गरीब लोकांशी वाईट वागणूक देणाऱ्यांविरूद्ध इशारा देत देव सर्वांचा आदरही करतो. अखेरीस, देवाला आदराने वागलेल्या वर्तनासह निष्ठावान आराधना करण्याची मागणी करतो. आमोसमार्फत देवाचे वचन इस्राएलमधील विशेषाधिकृत लोकांविरुद्ध निर्देशित केले गेले, जे लोक आपल्या शेजाऱ्यांबद्दल प्रेम न बाळगणारे, इतरांचा फायदा उचलतात आणि ज्यांनी स्वतःच्या चिंतांबद्दल पाहिले.
विषय
न्याय
रूपरेषा
1. राष्ट्रावरील विनाश — 1:1-2:16
2. संदेष्टा म्हणून बोलावणे — 3:1-8
3. इस्त्राएलाचा न्याय — 3:9-9:10
4. पुन:स्थापना — 9:11-15

1
इस्त्राएलाच्या शेजाऱ्यांचा न्याय
1 तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत. 2 तो म्हणाला:
सीयोनांतून परमेश्वर गर्जना करेल,
तो यरूशलेमेतून आपला शब्द उच्चारील.
मेंढपाळांची कुरणे शोक करतील,
आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल.
3 परमेश्वर असे म्हणतो,
“कारण दिमिष्काच्या तिन्ही पापांबद्दल,
अगदी चारहींमुळे,
मी त्यांना शासन करण्यापासून माघारी फिरणार नाही.
कारण त्यांनी गिलादला मळण्याच्या लोखंडी अवजाराने मळले आहे.
4 मी हजाएलच्या घरात अग्नी पाठवीन;
आणि तो अग्नी बेन-हदादच्या राजवाड्यांना गिळून टाकीन.
5 मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन,
आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा व आवेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा यांचा पराभव करीन.
आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.”
असे परमेश्वर म्हणतो.
6 आणि परमेश्वर असे म्हणतो,
“गज्जाच्या तिन्ही पापांबद्दल,
अगदी चारहींमुळे,
त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही.
कारण त्यांनी संपूर्ण लोकांस गुलाम म्हणून नेले,
ह्यासाठी की त्यांना अदोम्यांच्या हाती द्यावे.
7 म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन.
आणि हा अग्नी त्याचे किल्ले नष्ट करील.
8 मी अश्दोदमध्ये राहणाऱ्या मनुष्यास
आणि अष्कलोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्यास नष्ट करीन.
एक्रोनाच्या विरुद्ध मी माझा हात चालवीन.
आणि पलिष्ट्यांचे उरलेले लोक मरतील.”
असे परमेश्वर देव म्हणतो.
9 परमेश्वर असे म्हणतो,
“सोराच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे,
मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही.
कारण त्यांनी संपूर्ण लोकांस अदोम्यांच्या हाती दिले
आणि त्यांच्या भावांबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.
10 म्हणून सोराच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन
आणि तो त्यांचे किल्ले नष्ट करील.”
11 परमेश्वर असे म्हणतो,
“अदोमाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे,
मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही.
कारण अदोमाने तलवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला.
आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला.
त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला.
12 म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन,
ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.”
13 परमेश्वर असे म्हणतो,
“अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे,
मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही.
कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले,
ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा.
14 म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन,
त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी आरडाओरड होत असतांना,
आणि वावटळीच्या दिवशी वादळाने, ती त्याचे महाल खाऊन टाकील.
15 आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील.”
असे परमेश्वर म्हणतो.

आमोस 2 ->