Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
8
दावीद आपल्या राज्याचा विस्तार करतो
1 इति. 18:1-13

1 यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली. 2 मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या. त्यापैकी दोन रांगांतील लोकांस ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांस जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली. 3 रहोबाचा मुलगा हद्देजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हद्देजरचा पराभव केला. 4 सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने सोबाचा राजा हद्देजरकडून बळकावले रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करून टाकले. 5 दिमिष्कामधील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामी लोकांसही दावीदाने ठार केले. 6 मग त्याने दिमिष्कातील अरामात आपले बस्थान वसवले. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. परमेश्वराने, दावीदाला तो जाईल तेथे यश दिले. 7 हद्देजरच्या सैनिकांकडील [a]सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरूशलेमेला आणल्या. 8 हद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या. 9 हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले. 10 तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला, राजा दावीद याच्याकडे पाठवले. हद्देजरशी लढाईकरून त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करून त्यास आशीर्वाद दिले. (हद्देजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या. 11 दावीदाने त्या स्विकारून परमेश्वरास अर्पण केल्या. या आधीच्या समर्पित वस्तूबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रांमधून दावीदाने लूट आणलेली होती. 12 दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबाचा मुलगा, सोबाचा राजा हद्देजर याचा पराभव केला. 13 क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करून तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला. 14 अदोममध्ये त्याने शिपायांची ठाणी बसवली. अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली. अदोमी लोक त्याचे अंकित झाले. जेथे जाईल तेथे परमेश्वराने दावीदाला विजय मिळवून दिला.

दाविदाचे अंमलदार
1 इति. 18:14-17

15 दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले. 16 सरुवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस [b]होता. 17 अहीटूबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता. 18 यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. दावीदाचे पुत्र महत्वाचे मंत्री [c]होते.

<- 2 शमुवेल 72 शमुवेल 9 ->