1 वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर. 2 तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव.
9 जी विधवा साठ वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री झाली असेल. 10 जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्रजनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा. 11 पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते. 12 आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचा पहिला विश्वास टाकून दिला. 13 आणखी त्या घरोघरी फिरून आळशी बनतात व एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात. 14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. 15 मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत. 16 जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील.
20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
21 देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको. 22 घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
23 ह्यापुढे पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे, थोडासा द्राक्षरस घेत जा.
24 कित्येक मनुष्यांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरता जातात आणि कित्येकांची मागून जातात. 25 त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुद्धा कायमची लपवता येत नाहीत.
<- तीमथ्याला पहिले पत्र 4तीमथ्याला पहिले पत्र 6 ->