Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
3
दाविदाचे पुत्र
मत्त. 1:6

1 आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते.

अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ;
अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
2 गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र,
हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा.
3 अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा.
दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
4 दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरूशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले. 5 अम्मीएलची कन्या बथशूवा हिच्यापासून दाविदाला यरूशलेम शहरात चार पुत्र झाले. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.

6 इतर नऊ पुत्र;

इभार, अलीशामा, एलीफलेट, 7 नोगा, नेफेग, याफीय, 8 अलीशामा, एल्यादा, एलीफलेट. 9 ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.
दाविदाचे पुत्र
मत्त. 1:7-11

10 शलमोनाचा पुत्र रहाबाम होता.

रहबामाचा पुत्र अबीया होता.
अबीयाचा पुत्र आसा.
आसाचा पुत्र यहोशाफाट.
11 यहोशाफाटाचा पुत्र योराम.
योरामाचा पुत्र अहज्या होता.
अहज्याचा पुत्र योवाश होता.
12 योवाशाचा पुत्र अमस्या होता.
अमस्याचा पुत्र अजऱ्या होता.
अजऱ्याचा पुत्र योथाम होता.
13 योथामाचा पुत्र आहाज होता.
आहाजाचा पुत्र हिज्कीया,
हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.
14 मनश्शेचा पुत्र आमोन होता,
आमोनचा पुत्र योशीया होता.

15 योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम. 16 यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.

17 यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तीएल, 18 मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.

19 पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती. 20 जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत. 21 पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.

22 शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बारीहा, निरह्या आणि शाफाट. 23 निरह्या याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम. 24 एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.

<- 1 इतिहास 21 इतिहास 4 ->