2 नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती. 3 पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.’
4 इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलाच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे. कारण त्याने यहूदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली. 5 देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे.
6 त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. 7 माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.
8 तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकाळचे वतन म्हणून द्यावा.
9 हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत:करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील. 10 परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”
11 दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला. 12 त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा.
13 याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली. 14 सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले. 15 सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.
16 आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले. 17 शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले.
18 धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले. 19 दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”
20 दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही. 21 देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामांत कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागिर कामात मदत करण्यास तुझ्याबरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.”
<- 1 इतिहास 271 इतिहास 29 ->