4 इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते. 5 दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.
6 आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.
7 पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची, 8 तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची, 9 पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची, 10 सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची.
11 नववी येशूवाची, दहावी शकन्याची, 12 अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची 13 तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची, 14 पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची.
15 सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची, 16 एकोणीसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची, 17 एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची, 18 तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
19 परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
20 लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: