Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
20
दावीद राब्बा नगर घेतो
2 शमु. 11:1; 12:26-31

1 आणि असे झाले की, राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला. पण दावीद यरूशलेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला.

2 दावीदाने, त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन एक किक्कार[a] होते. तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली. 3 त्या नगरातील लोकांस बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरूशलेमेला परतले.

दाविदाच्या योद्ध्यांनी ठार केलेले धिप्पाड पुरूष
2 शमु. 21:15-22

4 यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टी लोक त्यांना शरण आले. 5 पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईराचा पुत्र एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. ज्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती.

6 गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच मनुष्य होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तोही रेफाईच्या वंशातला होता. 7 त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानाने त्यास ठार केले. 8 ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.

<- 1 इतिहास 191 इतिहास 21 ->