6 तसच तरूण माणससनी मर्यादाशील ऱ्हावाले पाहिजे म्हणीन त्यासले बोध कर. 7 सर्व गोष्टीसबद्दल चांगलं कामना आदर्श तु स्वतःले दखाड, शुध्दता, गांभीर्य, अनं ज्याले दोष लावता येस नही असा तुना उपदेश यासनी तुनं शिक्षण भरेल पाहिजे 8 अस खरंपण असाले पाहिजे की, विरोध करनारासले आपलाबद्दल काही वाईट बोलाले जागा ऱ्हावाव नही, म्हणीन त्यासले लाज वाटी 9 दाससनी आपला मालकना अधीन ऱ्हावानं त्यासले सर्व प्रकारतीन संतुष्ट करानं, उलट बोलानं नही, अस शिकाड. 10 त्यासले लुबाडानं नही तर सर्व प्रकारतीन ईमानदारपणतीन वागाणं, ह्याकरता की, त्यासनी सर्व गोष्टीसमा आपला तारणारा देव ह्याना शिक्षणले शोभा आणाले पाहिजे असा बोध कर.
11 कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे; 12 अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग. 13 धन्य आशा प्राप्तिनी म्हणजे असा जो आपला थोर देव अनं तारणारा येशु ख्रिस्त त्यानं गौरव प्रकट व्हवानी वाट दखत रहा. 14 [a]त्यानी स्वतःले आपलाकरता दि दिधं यानाकरता की, त्यानी खंडणी भरनी आपलाले सर्व प्रकारना अधर्मपाईन सोडावाले अनी चांगल्या कामसमा तत्पर अस आपला स्वतःकरता शुध्द लोके असा करीसन ठेवानं. 15 ह्या गोष्टी सांगीन बोध कर अनी अधिकारपुर्वक दोष पदरले लाव कोणी तुले तुच्छ मानाले नको अस वाग.
<- तिताले पत्र 1तिताले पत्र 3 ->- a २:१४ १ पेत्र २:९
Languages