Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
16
पौलना मित्रमंडळीले सलाम
1 किख्रियामाधला मंडळीनी सेविका, आपली बहिण फिबी हिनी मी तुमले शिफारस करस की; 2 तुम्हीन पवित्र जणसले शोभी अस प्रभुमा तिना स्वागत करा, अनी ज्या काममा तिले तुमनी गरज लागी त्यामा तुम्हीन तिले मदत करानं; कारण ती स्वतः बराच जणसले अनं मला बी सहाय्यक व्हयनी. 3 [a]ख्रिस्त येशुमा मना सहकारी, प्रिस्किल्ला अनं अक्विला यासले सलाम सांगं; 4 त्यासनी मना जिवकरता आपला जिव धोकामा टाका, अनी मी एकलाच त्यासना उपकार मानस अस नही, तर गैरयहूदी राष्ट्रमाधला मंडळी पण त्यासना उपकार मानस. 5 तसच जी मंडळी त्याना घरमा जमस तिले पण सलाम सांगानं; मना प्रिय अपैनत याले पण सलाम सांगानं; तो ख्रिस्तानाकरता आशिया प्रांतमा प्रथम फळ शे. 6 मरीयाले पण सलाम सांगानं; तिनी तुमनाकरता बरीच मेहनत लियेल शे. 7 मना नातेवाईक अनं सोबतना बंदिवान अंद्रोनिक अनं युनिया यासले सलाम सांगानं; कारण प्रेषितसमा त्यासनं नाव पहिले शे अनं मना पहिले त्या ख्रिस्तमा व्हतात. 8 प्रभुमा मना प्रिय आंप्लियात याले सलाम सांगानं. 9 ख्रिस्तमा आमना सहकारी उर्बान अनं मना प्रिय स्ताखु यासले सलाम सांगानं. 10 ख्रिस्तमा पसंतीस उतरेल अपिल्लेस याले सलाम सांगानं. अरिस्तबूलना घरमाधला मानसंसले सलाम सांगानं. 11 मना नातेवाईक हेरोदियोन याले सलाम सांगानं, नार्सिकना घरमाधला ज्या माणसे प्रभुमा शेतस त्यासले सलाम सांगानं. 12 प्रभुमा मेहनत करनारा त्रुफैना अनं त्रुफोसा यासले सलाम सांगानं, प्रिय पर्सिस हिले सलाम सांगानं, तिनी प्रभुमा बराच कष्ट करेल शेतस. 13 [b]प्रभुमा निवडेल रूफ याले, अनी माले मातासमान अशी जी त्यानी माय तिले पण सलाम सांगानं. 14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास अनी हर्मास यासले अनं त्यासनासंगे ज्या भाऊ अनं बहीणी शेतस त्यासले सलाम सांगानं. 15 फिललोगस अनं युलिया, नीरिय अनं त्यानी बहिण अनं ओलुंपास यासले सलाम सांगानं, अनी त्यासनासंगे ज्या पवित्रजण शेतस त्या सर्वासले सलाम सांगानं. 16 पवित्र चुंबन लिसन एकमेकसले सलाम करानं. ख्रिस्तानं सर्वा मंडळ्या तुमले सलाम सांगतस.
शेवटली सुचना
17 आते भाऊ अनं बहिणीसवनं, मी तुमले ईनंती करस की, तुमले जे शिक्षण मिळेल शे त्यानाविरोधमा ज्या फुट पाडतस अनी अडथळा निर्माण करतस, त्यासनावर ध्यान ठेवानं अनं त्यासनापाईन दूर रावानं. 18 कारण अस लोके आपला प्रभु ख्रिस्तनी सेवा करतस नही, तर स्वतःना पोटनाकरता सेवा करतस; अनी गोड भाषण करीसन भोळा माणसंसना मनले बहकावतस. 19 कारण तुमनं आज्ञापालन सर्वासले माहित व्हयेल शे, म्हणीन मी तुमनाबद्दल आनंद करस; तरी ज्या चांगलं शे, त्याबाबत तुम्हीन ज्ञानी रावानं अनी वाईटना बद्दल साधाभोळा बनी रावानं, अस मनी ईच्छा शे. 20 शांतीना देव सैतानले तुमना पायसना खाल लवकरस चेंदी टाकी. आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमनासोबत राहो. आमेन.

21 [c]मना सहकारी तिमथ्य अनं मना नातेवाईक लूक्य, यासोन अनं सोसिपेतर ह्या तुमले सलाम सांगतस. 22 हाई पत्र लिखिसन देणारा मी तर्तिय तुमले प्रभुमा सलाम सांगस. 23 [d]मना सर्वा मंडळीसना आतिथ्य करनारा गायस यानं तुमले सलाम. नगरना खजिनदार एरास्त अनं भाऊ क्वर्त यासना तुमले सलाम. 24 आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना सर्वासोबत राहो. आमेन.

देवनी स्तुती
25 आते मना सुवार्ताप्रमाणतीन अनी येशु ख्रिस्तना घोषणाप्रमाणतीन जे रहस्य मांगना युगानुयुगमा गुप्त ठेवामा येल व्हतं. 26 पण आते प्रकट करामा येल शे अनं संदेष्टासना शास्त्रलेखवरीन सनातन देवनं आज्ञाप्रमाणे ईश्वासना आज्ञापालनकरता सर्वा राष्ट्रसले सांगेल शे त्या रह्स्यनं प्रकटीकरणप्रमाणे जो तुमले स्थिर कराले समर्थ्य शे. 27 तो एकच ज्ञानी देव, त्याले येशु ख्रिस्तनाद्वारा युगानुयुग गौरव राहो. आमेन.

<- रोम 15