3 कारण माले देयल कृपानामुये मी तुमनामधला प्रत्येक जणसले सांगस की, त्यानी स्वतःला योग्यतापेक्षा अधिक मानानं नही, तर देवनी प्रत्येकले वाटी देयल ईश्वासना परिमानानुसार मर्यादमा स्वतःले मानानं. 4 [a]कारण जसं आपलाले एक शरीर राहीसन त्यामा बराच अवयव शेतस, तरी पण त्या सर्वा अवयवसना काम एकच नही, 5 तसं आपण बराच राहीसन ख्रिस्तमा एक शरीर शेतस; अनी आपण सर्वाजण एकमेकसना अवयव शेतस. 6 [b]पण आपलाले प्राप्त व्हयेल कृपादानप्रमाणे आपलाले वेगवेगळा कृपादान शेतस, जर ते संदेश सांगानं राहिनं तर ईश्वासना प्रमानमा आपण संदेश सांगानं. 7 सेवा करानं ऱ्हाईनं तर सेवा करामा तत्पर रावानं; जो शिकाडस त्यानी शिकाडामा 8 किंवा बोध करनारानी बोध करामा तत्पर रावानं; जो दान देस त्यानी उदारतातीन देवानं; जो कारभार चालाडस त्यानी तत्परमा कारभार चालावानं, जो दया करस त्यानी संतोषमा दया करानं.
9 प्रितीमा ढोंग नको; वाईट पाईन दूर रहा; चांगला शे त्याले बिलगी रावानं; 10 बंधुसना प्रितीमा एकमेकससंगे सहनशील दखाडा, तुम्हीन प्रत्येकजण दूसरासले आदर दिसन आपलापेक्षा मोठं माना; 11 काममा आळशी न राहता आत्मामा उत्सुक रावा; प्रभुनी सेवा करा; 12 आशामा आनंद करनारा; संकटमा धीर धरणारा; प्रार्थनामा तत्पर रावानं; 13 पवित्र जणसना गरजा पुर्ण करा; आतिथ्य करामा तत्पर रावानं. 14 [c]तुमना छळ करनारासले आशिर्वाद द्या; आशिर्वादच द्या, शाप देवानं नही. 15 आनंद करनारासंगे आनंद करा, अनी शोक करनारासंगे शोक करानं. 16 एकमेकसंगे एकमनना व्हा, मोठमोठल्या गोष्टीवर ईश्वास ठेवानं नही, तर लिन वृत्तीना लोकसना सहवास करा. स्वतःले शहाणं समजानं नही. 17 वाईटना बद्दल वाईट अस कोणी फेड करानी नही. सर्वा लोकसना दृष्टीनासमोर चांगला त्या गोष्टीवर ध्यान ठेवा. 18 शक्य राहिनं तर सर्वा लोकसंगे तुमनाकडीन जेवढं व्हई तेवढं शांतीमा राहा. 19 प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, तुम्हीन सुड लेवानं नही, तर देवना क्रोधले वाट द्या; कारण अस शास्त्रलेखमा लिखेल शे की, “सूड लेवानं मनाकडे शे, मी फेड करसु,” अस प्रभु सांगस. 20 पण जर तुना वैरी भूक्या व्हई तर त्याले खावाले दे; तिश्या व्हई तर त्याले पेवाले दे; कारण अस करावर त्याले लाज वाटी. 21 वाईटमा जिकाई जाऊ नको; चांगलाघाई वाईटले जिक.
<- रोम 11रोम 13 ->
Languages