Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
8
येशु चार हजार लोकसले जेवण देस
(मत्तय १५:३२-३९)

1 त्या दिनले लोकसनी मोठी गर्दी जमेल व्हती अनी त्यासनाकडे खावाकरता काहीच नव्हतं, म्हणीन येशुनी आपला शिष्यसले बलाईसन त्यासले सांगं, 2 “माले या लोकसनी किव ई ऱ्हायनी कारण त्या तीन दिनपाईन मनासंगे शेतस अनी आते त्यासनाजोडे खावाकरता काहीच नही. 3 अनी जर मी त्यासले भूक्या तिश्या घर जावाले लाई दिधं. तर त्या वाटमाच काल्या वाल्या करतीन कारण त्यासमा बराचजन दूरतीन येल शेतस.”

4 त्याना शिष्यसनी त्याले सांगं, “आठे ओसाड प्रदेशमा ह्या पोटभर खातीन इतलं जेवण कोण लई ई?”

5 येशुनी त्यासले ईचारं, “तुमना जोडे कितल्या भाकरी शेतस?” त्यासनी सांगं, “सात.”

6 मंग येशुनी लोकसले जमीनवर बसाले सांगं, त्या सात भाकरी लिसन देवना आभार मानात अनी त्या मोडीसन शिष्यसना जोडे वाढाकरता दिध्यात अनी त्यासनी लोकसले वाढ्यात. 7 त्यासनाजोडे काही धाकला मासापन व्हतात येशुनी त्यावर देवना आभार मानीन त्या पण वाढाले सांगात. 8 सर्वासनी पोटभर जेवण करं अनी जे उरनं त्याना सात टोपला भऱ्यात. 9 तठे जेवणकरता जवळजवळ चार हजार माणसे व्हतात. मंग येशुनी त्यासले घर जावाले लायं. 10 अनी तो आपला शिष्यसंगे नावमा बशीन दल्मनुथा प्रांतमा गया.

परूशीसनी येशुले चमत्कार दखाडाले सांगं
(मत्तय १६:१-४)

11 [a]मंग परूशी तठे ईसन येशुसंगे वाद घालाले लागनात अनी त्यानी परिक्षा दखाकरता त्यासनी त्याले सांगं, आकाशमा आमले काहीतरी चमत्कार दखाड. 12 [b]तवय त्याना आत्मा भलताच दुःखायना अनं येशु बोलना, “हाई पिढीना लोके चमत्कार का बर मांगतस? मी तुमले खरंखरं सांगस हाई पिढीना लोकसले कोणताच चमत्कार दखाडामा येवाव नही!”

13 तो त्यासले सोडीसन परत नावमा बशीन समुद्रना पलीकडे गया.

परूशी अनं हेरोद यासना खमीर
(मत्तय १६:५-१२)

14 नंतर शिष्य भाकरी लेवाले ईसरी जायल व्हतात अनी नावमा त्यासनाजोडे फक्त एकच भाकर व्हती. 15 [c]मंग येशुनी त्यासले बजाईन सांगं की, “परूशी [d]लोकसना अनी हेरोद राजाना खमीर[e] पाईन सावध रहा.”

16 तवय त्या एकमेकसले बोलू लागनात, “आपलाजोडे भाकरी नही शेतस म्हणीसन त्याले आपलाले हाई सांग.”

17 येशुनी हाई वळखीन त्यासले सांगं, तुमना जोडे भाकरी नही शेतस मंग चर्चा का बरं करतस? तुमले अजुन समजनं नही का? अनी ध्यानमा बी नही वनं का? तुमनं मन कठोर व्हई जायल शे का? 18 [f]डोया राहिसन तुम्हीन दखंतस नही का? कान राहिसन तुम्हीन ऐकतस नही का? तुमले याद नही का?

19 जवय मी पाच हजार लोकसले पाच भाकरी मोडीसन दिध्यात तवय तुम्हीन जे उरेल व्हतं त्याना कितल्या डालक्या उचल्यात? त्या बोलनात, बारा.

20 येशुनी ईचारं, “काय तुमले याद नही जवय मी चार हजार लोकसकरता सात भाकरी मोडात तवय तुम्हीन कितला टोपला भऱ्यात?” त्या बोलनात, “सात.”

21 तवय त्यानी त्यासले ईचारं, “तुमले अजुन नही समजनं का?”

येशु बेथसैदा गावमा आंधयाले बरं करस
22 मंग त्या बेथसैदा गावमा वनात तवय लोके येशुजोडे एक आंधया माणुसले लई वनात अनी तुम्हीन याले स्पर्श करा अशी त्याले ईनंती कराले लागनात. 23 तवय येशु त्या आंधया माणुसना हात धरीसन त्याले गावना बाहेर लई गया अनी त्याना डोयाले थुंक लाईन त्यानावर हात ठेईन त्याले ईचारं, “तुले काही दखाई राहीनं का?”

24 तवय तो वर दखीसन बोलना, “मी माणससले दखु शकस पण त्या माले चालता फिरता झाडसना मायक दखाई राहिनात.”

25 नंतर येशुनी त्याना डोयासवर परत हात ठेवात. तवय त्याना डोया उघडी गयात अनी त्याले सर्व स्पष्ट दखावाले लागणं अनी तो बरा व्हयना. 26 मंग येशुनी त्याले घर धाडतांना सांगं, “परत या गावमा जाऊ नको.”

येशु हाऊ देवनी निवडेल तारणहार
(मत्तय १६:१३-२०; लूक ९:१८-२१)

27 तवय येशु अनं त्याना शिष्य फिलीप्पाना कैसरियाना गावसमा जावाले निंघनात. तवय त्यानी शिष्यसले ईचारं, “लोके माले काय म्हणतस की, मी कोण शे?”

28 [g]तवय त्यासनी उत्तर दिधं, “काही लोके तुमले बाप्तिस्मा करनारा योहान, काहीजण तुमले एलिया अनं काहीजण तुमले संदेष्टास माधला एक, अस म्हणतस.”

29 [h]त्यानी त्यासले ईचारं, “पण तुमले काय वाटस मी कोण शे?”

तवय पेत्रनी त्याले उत्तर दिधं, “तुम्हीन तर तारणहार शेतस.”

30 मंग येशुनी त्यासले बजाईन आज्ञा करी की, “मनाबद्दल कोणलेच काही सांगु नका.”

मृत्यु अनं पुनरूत्थानबद्दल येशुनी करेल भविष्य
(मत्तय १६:२१-२८; लूक ९:२२-२७)

31 येशु शिष्यसले अस शिकाडू लागना की; “मनुष्यना पोऱ्याले भलताच दुःख भोगना पडतीन, वडील लोके, मुख्य याजक अनं शास्त्री लोके त्याले धिक्कारतीन, त्याले मारी टाकतीन, पण तीन दिन नंतर तो परत जिवत व्हई.” 32 हाई गोष्ट त्यानी उघडउघड सांगी दिधी, त्यामुये पेत्र त्याले बाजूले लई गया अनी त्याले धमकाडीन बोलणा, अस नही व्हवु शकस. 33 तवय येशुनी शिष्यकडे वळीसन दखं अनं तो पेत्रले धमकाडीन बोलना, “अरे सैतान, मना पुढतीन चालता व्हय,” कारण “देवन्या गोष्टीसकडे तुनं ध्यान नही, माणससना गोष्टीकडे शे!”

34 [i]मंग येशुनी लोकसनी गर्दीसंगे शिष्यसले बी जोडे बलाईन सांगं, “जर कोणले मनामांगे येवानी ईच्छा शे, तर त्याले आत्मत्याग कराना अनी स्वतःना क्रुसखांब उचलीसन मनामांगे येवानं. 35 [j]कारण जो कोणी स्वतःना जीव वाचाडाले दखी, तो त्याले गमाडी; अनी जो कोणी मनाकरता अनं वचनकरता जीव गमाडी तो त्याले वाचाडी. 36 माणुसले जगनं सर्व सुख भेटनं अनी स्वतःना जीव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई? 37 किंवा माणुस आपला जीवना बदलामा काय देवु शकस? 38 ह्या पापी अनं व्यभिचारी पिढीमा ज्याले मनी अनी मना वचननी लाज वाटी, मनुष्यना पोऱ्या, स्वर्गदेवदूतससंगे आपला पिताना गौरवमा ई, तवय त्याले बी त्यानी लाज वाटी.”

<- मार्क 7मार्क 9 ->