1 ✡लूक ५:१-३परत येशु गालील समुद्रना काठवर उपदेश करू लागना, अनी त्यानाजोडे लोकेसनी ईतली मोठी गर्दी जमनी की, तो एक नावमा जाईन बसना अनी सर्व लोके समुद्रना काठवर उभा व्हतात. 2 दृष्टांत *दृष्टांत म्हणजे स्वर्गमाधल्या गोष्टीसले त्यासले जगीक दृष्टांत देनं दिसन बऱ्याच गोष्टी शिकाडु लागना अनी आपला उपदेशमा तो त्यासले बोलना;
3 “ऐका! एक शेतकरी पेरणी कराकरता गया. 4 तो पेरणी करी राहिंता तवय काही दाना वाटवर पडनात त्यासले पक्षीसनी ईसन खाई टाकं. 5 काही दाना खडकाळ जमीनवर पडणात त्या लवकर उगनात पण तठे जास्त खालपावत माटी नव्हती म्हणीन त्यासले मुळकांड्याच वन्यात नहीत. 6 अनी जवय, सुर्य उगना तवय त्यासले ऊन लागनं अनं त्या सुकाई गयात. 7 काही दाना काटेरी झुडपसमा पडनात. त्या उगनात पण काटेरी झुडूप इतलं वाढनं की, त्या पिकले वाढुच दिधं नही म्हणीन पिक काय वनं नही. 8 काही दाना चांगली जमीनवर पडनात त्या उगनात, मोठा व्हईसन त्याले चांगलं पिक वनं; म्हणजे कोठे तिसपट, कोठे साठपट, तर कोठे शंभरपट पिक वनं.”
9 मंग येशु बोलना, “ज्याले कान शे, तो ऐको!”
10 मंग जवय येशु एकटा व्हता, तवय त्याना बारा शिष्य अनं बाकीना शिष्यसनी त्याले ईचारं, दृष्टांतना अर्थ काय शे. 11 तवय येशुनी त्यासले उत्तर दिधं, “देवराज्यना रहस्यनी माहिती करी लेवानी तुमले मोकळीक शे,” पण ज्या देवराज्यना बाहेर शेतस त्यासले सर्वकाही दृष्टांत दिसनच सांगनं पडी.
13 येशु आखो त्यासले बोलना, “तुमले या दृष्टांतना अर्थ नही समजना? तर, सर्व दृष्टांत कशा समजतीन? 14 शेतकरी पेरस ते देवनं वचन शे. 15 काही लोके पाय वाटनामायक शेतस अनी त्या दाना म्हणजे देवनं वचन, त्यासना कानवर वचन पडस नही पडस तोच सैतान येस अनी त्यासना मनमा पेरेल वचनले हिराई लेस. 16 खडकाळ जमीनवर पेरेल दाना म्हणजे आनंदमा देवनं वचन स्विकारनारा लोके, खडकाळ जमीनवर पेरेल रोपटासले खालपावत मूळ धरता येस नही. तसा या लोकसना मनमा देवनं वचन खोलवर जाऊ शकस नही. 17 त्या रोपे वाढतस पण त्यासना मुळंच निंघतस नही म्हणीन त्या जास्त काळ टिकतस नही, देवनं वचनना स्विकार करामुये त्यासनावर संकटे येवाले लागनात, त्यासना छळ होऊ लागना म्हणजे त्या अडखळाले लागतस. 18 काही लोके काटेरी झुडपसमा पेरेलनामायक शेतस म्हणजे त्या देवना वचन ऐकतस, 19 पण लवकरच त्यासले संसारनी चिंता, पैसानी चिंता अनं इतर गोष्टीसना लोभ त्यासले भुरळ पाडस अनी त्यासना मनमधला देवना वचननी वाढ व्हस नही अनी त्यासले ते बिनकामनं करी टाकस. 20 त्यानापेक्षा ज्या चांगली जमीननामायक शेतस की, ज्या देवनं वचन ऐकीन त्याना स्विकार करतस ह्याच लोके तिसपट, साठपट अनं शंभरपट पिक देतस.”
21 ✡मत्तय ५:१५; लूक ११:३३मंग येशुनी त्यासले ईचारं, “दिवा लाईसन चंपानाखाल किंवा खाटना खाल ठेवाकरता लावतस का? त्याना उजेड पडाले पाहिजे म्हणीसन त्याले दिवठणीवर ठेवाकरता लावतस की नही? 22 ✡मत्तय १०:२६; लूक १२:२ज्या देवराज्यना रहस्य तुमले आज गुप्त वाटतस, त्या आज नही सकाय तुमनासमोर उघड व्हईच, ह्यानी खात्री बाळगा.” 23 “ज्यासले ऐकाले कान शेतस, त्यासनी ऐकी ल्या!”
24 ✡मत्तय ७:२; लूक ६:३८परत येशुनी त्यासले सांगं, “तुम्हीन जे ऐकतस ते नीट ध्यानमा ल्या, ज्या नियमतीन तुम्हीन न्याय करशात, त्याच नियमघाई देव तुमना न्याय करी अनी त्यानापेक्षा बी वाईट करी. 25 ✡मत्तय १३:१२; २५:२९; लूक १९:२६कारण ज्यानाजोडे शे, त्याले अजुन भेटी अनी ज्यानाकडे नही शे, त्यानाकडे जे व्हई, ते पण त्यानाकडतीन काढी लेतीन.”
30 आखो येशु बोलना, “मी देवना राज्यले कसानी उपमा देऊ?” “कोणता दृष्टांत सांगीसन त्यानं वर्णन करू? 31 देवनं राज्य हाई मोहरीना दाणाना मायक शे, जो जमीनमा पेरणारा दानासमा पृथ्वीवरला सर्वात धाकला दाना ऱ्हास. 32 तरी पण पेरा नंतर तो जवय उगस तवय बाकीना रोपटास पेक्षा त्यान्या फांद्या ईतल्या मोठ्या वाढतस की, त्याना फांद्यावर सावलीमा पक्षीपण घरटा बांधीसन राहतस.”
33 त्यासनी समजी लेवानी क्षमता ध्यानमा लिसन त्यानी त्यासले बराच दृष्टांत सांगीन संदेश दिधा. 34 लोकससंगे जवय तो शिकाडे तवय तो दृष्टांत सांगीसनच शिकाडे, एकांतमा तो त्याना शिष्यसले सर्व दृष्टांत समजाडीसन सांगे.
35 त्याच दिन संध्याकाय व्हवावर येशुनी शिष्यसले सांगं, “आपण समुद्रना पलीकडे जाऊ.” 36 मंग लोकसले सोडीन तो जी नाववर बशेल व्हता त्याच नावमा त्याना शिष्य त्याले संगे लई गयात. त्यासनासंगे बाकिन्या नावपण व्हत्यात. 37 थोडा येळमा मोठं वादय सुरू व्हयनं अनं मोठं-मोठल्या लाटा नाववर आदळाले लागनात. त्यामुये नावमा पाणी भराले लागनं. 38 येशु नावना मांगला बाजुले उशीवर डोकं ठिन गाड झोपेल व्हता, तवय शिष्यसनी त्याले ऊठाडं अनी त्या बोलनात, “गुरजी आपण सर्वाजन मरी जासुत ह्यानी तुमले चिंता नही का?”
39 तवय येशु ऊभा राहिना, त्यानी वादयले आज्ञा करी, “शांत व्हई जा!” अनी लाटासले तो बोलना, “थांबी जाय,” तवय वादय बंद व्हई गयं अनी शांतता पसरी गयी. 40 येशुनी शिष्यसले ईचारं, “तुम्हीन ईतला का बरं घाबरी जातस? तुमले अजुन बी ईश्वास नही का?”
41 मंग शिष्य भलताच घाबरी गयात अनी एकमेकसले सांगु लागनात, “हाऊ शे तरी कोण? वादय अनी लाटा या पण ह्यानी आज्ञा पाळतस!”
<- मार्क 3मार्क 5 ->- b दृष्टांत म्हणजे स्वर्गमाधल्या गोष्टीसले त्यासले जगीक दृष्टांत देनं
- ~3~ “त्या लोके डोयासघाई दखतीन; कानघाई ऐकतीन, तरी त्यासले काहीच समजाव नही; पण जर त्यासनी समजी लिधं तर त्या देवकडे वळतीन अनी त्यासले माफी भेटु शकस.” यशया 6:9-10
✡4:21 मत्तय ५:१५; लूक ११:३३
✡4:22 मत्तय १०:२६; लूक १२:२
✡4:24 मत्तय ७:२; लूक ६:३८
✡4:25 मत्तय १३:१२; २५:२९; लूक १९:२६
✡4:1 लूक ५:१-३