Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
16
येशुनं पुनरूत्थान
(मत्तय २८:१-८; लूक २४:१-१२; योहान २०:१-१०)

1 शब्बाथ दिन सरानंतर मग्दालीया मरीया, याकोबनी माय मरीया अनी सलोमे यासनी येशुना शरिरले लावाकरता सुगंधी द्रव्ये ईकत लिधात; 2 अनी रविवारना दिन सकायले सुर्य उगाना येळले कबरजोडे गयात. 3 “कबरना तोंडवरली धोंड आपलाकरता कोण लोटी?” अस त्या एकमेकसले सांगी राहिंत्यात.

4 पण तठे जावानंतर त्यासनी दखं की, ती भलती मोठी धोंड कबरना दारना एकबाजुले लोटेल शे; 5 मंग कबरमा जावानंतर धवळा शुभ्र कपडा घालेल एक तरूणले म्हणजे स्वर्गदूतले उजवा बाजुले बशेल दखीसन त्या घाबरन्यात.

6 तो त्यासले बोलना, “घाबरू नका, क्रुसखांबवर खियेल नासरेथ गावना येशुना शोध तुम्हीन करी राहिनात; तो आठे नही, तो उठेल शे; त्याले ठेयल व्हतं ती हाई जागा दखा. 7 [a]आते तुम्हीन जा, त्याना शिष्यसले अनी पेत्रले सांगा की, तुमना पहिलेच तो गालीलमा जाई राहीना; त्यानी तुमले सांगेल प्रमाणे तो तुमले तठे दखाई.”

8 मंग त्यासना थरकाप व्हयना अनी कावऱ्या बावऱ्या व्हईसन त्या कबरपाईन पळण्यात; त्यासनी कोणलेच काही सांगं नही; कारण त्या दुःखी अनी घाबरी जायेल व्हत्यात.

येशु मरीया मग्दालियाले दखास
(मत्तय २८:९,१०; योहान २०:११-१८)

9 रविवारना पहाटले येशु जिवत व्हवानंतर, ज्या मरीया मग्दालीया मातीन त्यानी सात दुष्ट आत्मा काढेल व्हतात तिले तो पहिले दखायना. 10 पहिले येशुसंगे ज्या लोके व्हतात, त्यानाकरता ज्या शोक करी राहींतात अनी रडी राहींतात त्यासले जाईसन तिनी हाई बातमी सांगी. 11 आते येशु जिवत शे अनी तिले तो दखायना, जवय हाई त्यासनी ऐकं तवय त्यासनी तिनावर ईश्वास ठेवा नही.

येशु दोन शिष्यसले दखास
(लूक २४:१३-३५)

12 त्यानंतर त्यामाधला दोनजण बाहेर गाव जाई राहींतात त्यासले येशु दुसरा रूपमा दखायना. 13 त्यासनी जाईन बाकीनासले सांगं पण त्यासनी त्यासनावर ईश्वास ठेया नही.

येशु अकरा शिष्यसले दखास
(मत्तय २८:१६-२०; लूक २४:३६-४९; योहान २०:१९-२३; प्रेषित १:६-८)

14 नंतर अकरा शिष्य जेवाले बशेल व्हतात. त्यासले पण येशु दखायना अनी त्यानी त्यासना अईश्वास अनी कठीण मन यामुये त्यासले दटाडं कारण ज्यासनी त्याले जिवत व्हयेल दखेल व्हतं, त्यासनावर त्यासनी ईश्वास ठेया नही म्हणीन. 15 [b]त्यानी त्यासले सांगं की, “सर्व जगमा जाईसन सर्वा लोकसले शुभवर्तमानना प्रचार करा. 16 जो ईश्वास धरी अनी बाप्तिस्मा ली त्यानं तारण व्हई; जो ईश्वास धराव नही त्याना न्याय व्हई अनी तो दोषी ठराई जाई. 17 अनी ज्या ईश्वास धरतीन त्यासनामा ह्या चिन्ह दखाईतीन; त्या मना नावतीन दुष्ट आत्मा काढतीन; नव्या नव्या भाषा बोलतीन; 18 जर त्या साप उचलतीन अनी विष पितीन तरी त्यासले काहीच व्हवाव नही; त्यासनी आजारीसवर हात ठेवात म्हणजे त्या बरा व्हतीन.”

येशु स्वर्गमा उचलाई जास
(लूक २४:५०-५३; प्रेषित १:९-११)

19 [c]मंग प्रभु येशुनं त्यासनासंगे बोलनं व्हवानंतर तो स्वर्गमा उचलाई गया अनी देवना उजवी बाजुले बसना.

20 मंग त्यासनी जाईन सर्वीकडे प्रचार करा, प्रभु त्यासनासंगे कामकरी राहींता अनी ज्या चमत्कार व्हई राहींतात, त्यावरतीन शिष्यसनी सांगेल वचन सत्य शे अनी प्रभु त्यासनासंगे शे यानी खात्री पटी राहींती. आमेन.[d]

<- मार्क 15