17 यरूशलेमले जातांना येशुनी वाटमा त्याना बारा शिष्यसले एकांतमा लई जाईन सांगं, 18 दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत; मनुष्यना पोऱ्याले मुख्य याजक *याजक धर्मगुरूअनं शास्त्री यासना हवाले करतीन, त्या त्याले मरणदंडसाठे दोषी ठरावतीन. 19 त्या त्यानी थट्टा कराले, फटका माराले अनं क्रुसखांबवर खियाले त्याले गैरयहूदीसना हवाले करतीन अनी तिन दिनमा तो परत जिवत व्हई.
20 तवय जब्दीना पोऱ्यासनी माय तिना पोऱ्याससंगे येशुकडे गई अनी त्याना पाया पडीसन त्याले एक ईनंती करी 21 येशुनी तिले ईचारं, तुले काय पाहिजे? ती त्याले बोलनी, तुना राज्यमा मना ह्या दोन्ही पोऱ्यासमाधला एकले उजवीकडे अनी दुसराले तुना डावीकडे बसाडं, अशी मनी ईच्छा शे. 22 येशुनी तिले उत्तर दिधं की, तुम्हीन काय मांगी राहीनात तुमले समजत नही. जो प्याला मी पेवाव शे तो तुमले पिता ई का त्या त्याले बोलनात, पिता ई. 23 त्यानी त्यासले सांगं, मना प्याला तुम्हीन पिशात हाई खरं, पण मना उजवीकडे अनं डावीकडे बसाना अधिकार देनं मनाकडे नही शे, तर ज्यासनाकरता मना बापनी हाई जागा तयार करेल शे, हाई त्यासनाकरता शे. 24 हाई गोष्ट ऐकीन दहा शिष्यसले त्या दोन्ही भाऊसना राग वना. 25 ✡लूक २२:२५,२६येशुनी त्यासले बलाईसन सांगं, गैरयहूदीसमा अधिकारी प्रभुत्व चालाडतस अनं मोठा लोके बी अधिकार गाजाडतस हाई तुमले माहीत शे. 26 ✡मत्तय २३:११; मार्क ९:३५; लूक २२:२६पण तुमनामा तसं व्हवाले नको; म्हणीन तुमनामा ज्याले कोणले श्रेष्ठ होणं शे, त्यानी पहिले तुमना सेवक व्हवाले पाहिजे. 27 अनी तुमनामा ज्याले पहिला व्हवानी ईच्छा शे, त्यानी तुमना दास व्हवाले पाहिजे. 28 यामुये मनुष्यना पोऱ्या सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी बराच लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे.
29 मंग त्या यरीहो शहरतीन जाई राहींतात तवय लोकसनी मोठी गर्दी त्यासना मांगे चाली राहींती. 30 तवय दखा, वाटवर बशेल दोन आंधयासनी येशु जवळतीन जाई राहीना, हाई ऐकीन, त्या वरडीसन बोलणात, “प्रभु, अहो दावीदना पोऱ्या, आमनावर दया करा.” 31 तवय त्यासले लोकसनी वरडू नका अस धमकाडं, पण त्या जास्तच वरडीन बोलु लागणात, “प्रभु, अहो दावीदना पोऱ्या! आमनावर दया करा.” 32 येशुनी ऊभं राहीसन त्यासले बलाईन सांगं, “मी तुमनाकरता काय करू अशी तुमनी ईच्छा शे?” 33 त्या बोलणात, “प्रभुजी, आमनी ईच्छा शे की, आमना डोया उघडी जावोत.” 34 तवय येशुले त्यासनी किव वनी त्यानी त्यासना डोयाले स्पर्श करा; तवय त्यासले लगेच दखावु लागनं, अनी त्या त्याना मांगे चालु लागणात.
<- मत्तय 19मत्तय 21 ->