1 बेखमीर भाकरना सण, ज्याले वल्हांडण म्हणतस, तो जोडे येल व्हता; 2 तवय मुख्य याजक अनं शास्त्री या येशुना घात कसा कराना याना ईचार करी राहींतात; कारण त्यासले लोकसनी भिती वाटी राहिंती.
3 तवय बारा शिष्यसमधला एक यहूदा ज्याले इस्कर्योत म्हणेत, त्यानामा सैतान शिरना; 4 अनं तो मुख्य याजक अनं मंदिरना शिपाई यासनाजोडे निंघी गया अनी येशुले त्यासना हातमा कसं धरी देवानं यानाबद्दल त्यासनासंगे बोलनं करं. 5 तवय त्यासले आनंद व्हयना अनी त्यासनी त्याले पैसा देवानं ठरायं. 6 त्याले त्यासनी अट मंजुर व्हयनी अनी जठे लोकसनी गर्दी ऱ्हावावु नही तठे येशुले एकांतमा धरी देवानी संधी तो शोधाले लागना.
7 बेखमीर भाकरना सणना तो दिन वना जवय वल्हांडणना यज्ञकरता कोकरूना बळी देतस. 8 तवय येशुनी पेत्र अनं योहान यासले अस सांगीसन धाडं की, “आपलाकरता वल्हांडण सणनं जेवण खावाकरता तुम्हीन जाईसन तयारी करा.”
9 त्या त्याले बोलनात, “आम्हीन त्यानी तयारी कोठे कराले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे?”
10 त्यानी त्यासले सांगं, दखा, तुम्हीन नगरमा जावावर पाणीनी घागर लई जाणारा एक माणुस तुमले दखाई; तो ज्या घरमा जाई त्यानामांगे तुम्हीन पण जा; 11 अनी त्या घरना मालकले अस सांगा, गुरजी, तुमले सांगं की, माले मना शिष्यसंगे वल्हांडणनं जेवणकरता ई अशी पाहुणचार करानी खोली कोठे शे? 12 मंग तो तुमले सजाडेल वरली खोली दखाडी, तठे तुम्हीन भोजननी तयारी करा.
13 तवय त्या गयात अनं येशुनी सांगेलप्रमाणेच त्यासले दखायनं; अनी त्यासनी वल्हांडणना जेवणनी तयारी करी.
14 मंग येळ व्हयनी तवय येशु जेवणले बसना अनं त्यानासंगे प्रेषित बी बसनात. 15 तवय तो त्यासले बोलना, “मी दुःख भोगाना पहिले हाई वल्हांडणन सणनं जेवण तुमनासंगे करावं अशी मनी भलतीच ईच्छा व्हती! 16 कारण मी तुमले सांगस की, देवना राज्यमा हाई पुर्ण व्हस नही तोपावत मी हाई जेवण परत करावु नही.”
17 मंग प्याला हातमा लिसन अनं देवना उपकार मानीन येशु बोलना, “हाऊ ल्या अनी आपसमा वाटी ल्या; 18 कारण मी तुमले सांगस की, देवना राज्य येस नही तोपावत मी यानापुढे द्राक्षरस पेवाऊ नही. 19 मंग त्यानी भाकर लिसन अनं देवना उपकार मानीसन तीले मोडं अनी त्यासले ती दिसन सांगं, हाई मनं शरीर शे; ते तुमनाकरता देवाई जाई राहिनं मना स्मरणार्थ हाई करा. 20 मंग जेवण व्हवावर त्यानी प्याला लिसन सांगं, हाऊ प्याला मना ‘रंगतमा’ नवा ‘करार’ शे. ते रंगत तुमनाकरता ओताई राहिना शे; 21 पण दखा, माले धरीसन देणाराना हात मनाबरोबर मेजवर शे! 22 मनुष्यना पोऱ्या ठरेल येळनाप्रमाणे जाई हाई खरं; पण ज्याना हाततीन त्याले धरी देतीन त्या माणुसनी कशी अवस्था व्हई!”
23 तवय आपलामातीन जो अस कराणार शे तो कोण व्हई, याना त्या आपसमा चर्चा कराले लागनात.
28 “अनी मनी परिक्षामा मनासंगे टिकी राहनारा तुम्हीनच शेतस; 29 जसं मना बापनी माले राज्यवर अधिकार देयल शे, तसाच अधिकार मी पण तुमले दिसु. 30 [e]यानाकरता की, तुम्हीन मना राज्यमा मना मेजवर खावानं अनं प्यावानं, अनी राजासनवर बसीन इस्त्राएलना बारा वंशसना न्याय कराना.”
31 शिमोन, शिमोन! दख! तुमले सर्वासले पारखाकरता सैताननी परवानगी मांगी लियेल शे; वाईटसमातीन चांगलासले येगळा कराकरता जसं की शेतकरी भुशामातीन गहु येगळा करस. 32 पण मी तुनाकरता प्रार्थना करेल शे की, तुना ईश्वास ढळाले नको अनी जवय तू मनाकडे वळशी, तवय तु तुना भाऊसले हिम्मत दे.
33 पेत्र बोलना, “प्रभुजी, मी तुमनासंगे कैदखानामा जावाले अनं मराले बी तयार शे!”
34 येशु बोलना, “पेत्र, मी तुले सांगस, माले वळखस नही अस तू तीनदाव सांगस नही तोपावत पहाटले कोंबडा कोकावणार नही.”
39 मंग येशु शहर बाहेर ईसन आपला रोजप्रमाणे जैतुनना डोंगरकडे गया अनं त्याना शिष्य बी त्याना मांगेमांगे गयात. 40 त्या तठे येवावर त्यानी त्यासले सांगं, “तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीसन प्रार्थना करा.” 41 मंग त्यासनापाईन दगड जितला दूर फेकामा ई इतला दुर तो गया; अनी त्यानी गुडघा टेकीन अशी प्रार्थना करी; 42 “हे बापा, तुनी ईच्छा व्हई तर हाऊ दुःखना प्याला मनापाईन दूर कर, तरी मना ईच्छाप्रमाणे नही, तर तुना ईच्छाप्रमाणं होऊ दे.” 43 तवय स्वर्गामाईन एक देवदूत ईसन आपले बळ दि राहीना अस त्यानी दखं. 44 मंग तो भलताच व्याकुळ व्हईना अनं त्यानी भलती कळकळ करीसन प्रार्थना करी, तवय त्याना घाम रंगतना मोठं मोठा थेंब जमीनवर पडतस असा पडी राहिंता.
45 प्रार्थना करीसन ऊठावर तो शिष्यसना जोडे वना तवय त्या शोकमुये झोपी जायेल त्याले दखायनात. 46 तो त्यासले बोलना, “झोपी काय राहिनात? तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन ऊठीसन प्रार्थना करा.”
47 येशु बोली राहींता इतलामा दखा, लोकसनी गर्दी वनी, त्यामा यहूदा नावना बारा शिष्यमधला एकजण, त्यासनापुढे चाली राहिंता; तो येशुनं चुंबन लेवाले त्यानाजोडे वना. 48 येशु त्याले बोलना, “यहूदा, चुंबन लिसन मनुष्यना पोऱ्याले धरीन दि राहिना का?” 49 त्याना शिष्य ज्या संगे व्हतात आते काय व्हई हाई वळखीन त्याले बोलनात, “प्रभुजी, आम्हीन तलवार चालाऊत का?” 50 त्यासनामाईन एकनी प्रमुख याजकना दासवर वार करीसन त्याना उजवा कान छाटी टाका. 51 तवय येशुनी सांगं, “अस करू नका!” अनी त्यानी त्या माणुसना कानले हात लाईन त्याले बरं करं.
52 ज्या मुख्य याजक, सरदार, अनी वडील लोके त्यानावर चाली वन्तात त्यासले येशु बोलना, “जशा कायदा मोडणाराले लई जातस तसा तुम्हीन तलवारी अनं भाला लिसन येल शेतस का. 53 [g]मी रोज मंदिरमा तुमनासंगे राहु तरी तुम्हीन माले पकडाना प्रयत्न करा नही; पण हाई येळ अनी अंधारनं राज्य तुमनच शे.”
54 मंग त्या येशुले कैद करीसन मुख्य याजकना घर लई गयात; मंग पेत्र दुरतीन त्याना मांगेमांगे चालु लागना, 55 राजवाडाना अंगनणा मध्यभागमा ईस्तव पेटाडीसन ज्या एकत्र बसेल व्हतात, त्यासनामा पेत्र पण जाईन बसना. 56 तवय एक दासीनी त्याले ईस्तव जोडे बसेल दखीसन त्यानाकडे टक लाईन सांगं, “हाऊ पण येशुसंगे व्हता!” 57 पण तो नाकारीसन बोलना, “बाई, मी त्याले वळखत नही!” 58 थोडा येळमा दुसरा एकनी त्याले दखीसन सांगं, “तु बी त्यासनामधलाच शे!”
59 जवळजवळ एक तास व्हवावर आखो एकजण खात्री दिसन सांगु लागना, “खरच हाऊ बी येशुनासंगे व्हता; हाऊ गालीलीच शे!” 60 पेत्र बोलना, “अरे भाऊ, माले नही माहीत तु कशाबद्दल बोली राहिना!”
63 ज्या लोकसनी येशुले धरेल व्हतं त्या त्यानी थट्टा करीसन त्याले मारी ऱ्हांईतात. 64 त्यासनी त्याना डोयावर बांधीसन त्याले ईचारं, “वळखं! तुले कोणी मारं?” 65 त्यासनी त्यानी थट्टा करीसन त्यानाविरूध्दमा अजुन बराच वाईट शब्द बोलनात.
66 मंग दिन उगना तवय लोकसना वडीलमंडळ, मुख्य याजक अनं शास्त्री एकत्र जमनात; अनी त्या येशुले आपला न्यायसभामा लई गयात, 67 त्या बोलनात, “तु ख्रिस्त व्हई तर आमले सांगं” त्यानी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले सांगसु तरी तुम्हीन कधीच ईश्वास ठेवावुत नही; 68 अनी मी जर तुमले काही ईचारं तर तुम्हीन उत्तर देता येवाव नही; 69 तरी यानापुढे मनुष्यना पोऱ्या सर्वसमर्थ देवना उजवीकडे बशी.”
70 तवय त्या सर्व बोलनात, “म्हणजे तु देवना पोऱ्या शे का?”
Languages