1 त्या दिनसमा अस व्हयनं की, सर्व रोमी साम्राज्यनी जनगणना व्हवाले पाहिजे अशी सम्राट कैसर औगुस्त यानी आज्ञा करी. 2 हाई पहिली जनगणना व्हयनी तवय क्वीरीनिय हाऊ सिरिया प्रांतना सुबेदार व्हता. 3 मंग सर्व लोके आपलाआपला गावले नाव नोंदाले गयात.
4 योसेफ बी गालीलना नासरेथ गावतीन यहूदीयामधला बेथलहेम गावले म्हणजे दावीदना गावले गया कारण तो दावीदना घराणामधला अनं वंश मधला व्हता. 5 तो आपली मागणी व्हयेल मरीयासंगे नाव नोंदाले गया, तिले दिन व्हतात. 6 अनी त्या तठे व्हतात तवय अस व्हयनं की, तिना दिन पुरा व्हयनात. 7 तिनी आपला पहिला पोऱ्याले जन्म दिधा अनी त्याले कापडमा गुंढाळीन गव्हाणीमा निजाडं, कारण त्यासले उतारशाळमा जागा नव्हती.
13 इतलामा अचानक स्वर्ग माधला देवदूतसना घोळका त्या देवदूतजोडे प्रकट व्हयना; त्या देवनी स्तुती करीसन बोलनात,
15 मंग असं व्हयनं की, देवदूत त्यासना जोडेतीन स्वर्गमा निंघी गयात तवय मेंढपाळ एकमेकसले सांगाले लागनात, “चला, आपण बेथलहेमले जाऊ अनं हाई जी घडेल गोष्ट प्रभुनी आपले सांगी ती दखु.”
16 तवय त्या लगेच जाईन मरीया अनं योसेफ यासनाजोडे पोहंचनात अनी त्यासनी त्या बाळले गव्हाणीमा निजेल दखं. 17 जवय मेंढपायनी त्यासले दखं तवय जी गोष्ट देवदूतनी बाळाबद्दल सांगेल व्हती ती त्यासले सांगी. 18 मंग सर्व ऐकणारासले मेंढपाळसनी सांगेल गोष्टीसनं आश्चर्य वाटणं. 19 पण मरीया ह्या गोष्टी मनमा ठेईन ईचार करत राहिनी. 20 मंग देवदूतनी मेंढपायसले सांगेल व्हतं त्यानाप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकीसन अनं दखीसन; त्या देवना गौरव करत परत गयात.
25 यरूशलेममा शिमोन नावना एक धार्मीक अनी भक्ती करनारा माणुस व्हता, तो इस्त्राएलले वाचाडनारानी वाट दखी राहिंता अनी पवित्र आत्मा त्यानासंगे व्हता. 26 अनी प्रभु ख्रिस्तले दखाना पहिले तु मराव नही अस पवित्र आत्मानी त्याले प्रकट करेल व्हतं 27 शिमोन पवित्र आत्माना प्रेरणातीन मंदिरमा वना अनी जवय नियमशास्त्रना विधीप्रमाणे कराकरता येशु बाळाना मायबाप त्याले मंदिरमा लई वनात, 28 तवय शिमोननी त्याले हातमा लिधं अनं देवले धन्यवाद दिसन बोलना;
33 शिमोननी येशु बाळबद्दल सांगेल गोष्टीसवरतीन त्याना माय बापले आश्चर्य वाटणं. 34 शिमोननी त्यासले आशिर्वाद दिसन येशुनी माय मरीयाले सांगं दख, “हाई बाळ इस्त्राएलमधला बराच जणसना नाश अनं तारण याकरता अनी ज्यानाविरूध्द लोक बोलतीन असं चिन्ह व्हवाकरता याले देवनी निवडेल शे 35 यामुये बराच लोकसना मनमाधला ईचार उघड व्हवाकरता तुना स्वतःना हृदयले तलवारनामायक दुःख चिरी जाई.”
36 आशेरना वंशमातील फनूएलनी पोर हन्ना नावनी एक संदेष्टी व्हती, ती लगीनना सात वरीस नंतर तिना नवरा मरी गया, ती भलती म्हतारी व्हयेल व्हती. 37 आते ती चौऱ्यांशी वरीसनी विधवा व्हती, तरी ती देवनं मंदिर कधीच सोडीन नही जाता रातदिन देवनी भक्ती करे अनं उपास प्रार्थना करे. 38 त्याच येळले तिनी ईसन देवना आभार मानात अनी यरूशलेमनी सुटकानी ज्या वाट दखी राहींतात त्या सर्वासले तिनी त्या बाळबद्दल सांगं.
49 तो त्यासले बोलना, “तुम्हीन माले का बर शोधी राहींतात? तुमले माहीत नही का की, माले मना बापना घरमा ऱ्हावाले पाहिजे?” 50 पण तो जे बोलना ते त्यासले समजनं नही.
51 मंग तो त्यासनासंगे निंघीन नासरेथले गया अनं त्यासनी आज्ञामा राहीना; त्यानी मायनी ह्या सर्व गोष्टी आपला मनमाच ठेयात. 52 येशु हाऊ ज्ञानघाई, शरीरघाई अनी माणुसना अनी परमेश्वरनी कृपामा वाढत गया.
<- लूक 1लूक 3 ->
Languages