5 मी वेल शे तुम्हीन फाटा शेतस जो मनामा ऱ्हास, तो बरंच फळ देस; कारण मनापाईन येगळं राहीनात तर तुमले काहीच करता येवाव नही. 6 जर कोणी मनामा राहीना नही तर त्याले तुटेल फाटानामायक बाहेर टाकतस, अनं तो वाळाई जास; मंग त्यासले गोया करीसन आगमा टाकतस अनं त्या जळी जातस. 7 तुम्हीन मनामा राहीनात अनी मना वचनं तुमनामा राहीनात, तर जे काही तुमले पाहिजे व्हई ते मांगा म्हणजे तुमले ते भेटी जाई. 8 तुम्हीन बरंच फळ दिधं तर पितानं गौरव व्हई अनी तुम्हीन मना शिष्य व्हशात. 9 जशी पितानी मनावर प्रिती करी तशी मी बी तुमनावर प्रिती करेल शे, तुम्हीन मनी प्रितीमा राहा. 10 जसं मी मना पितान्या आज्ञा पाळीसन त्यानी प्रितीमा ऱ्हास, तसं तुम्हीन मन्या आज्ञा पाळ्यात तर मनी प्रितीमा राहशात.
11 मना आनंद तुमनामा ऱ्हावाले पाहिजे अनी तुमना आनंद परीपुर्ण व्हवाले पाहिजे म्हणीसन मी तुमले या गोष्टी सांगेल शेतस. 12 [a]जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी अशी मनी आज्ञा शे. 13 आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही. 14 मी तुमले जे काही सांगस ते जर तुम्हीन करशात तर तुम्हीन मना मित्र शेतस. 15 मी आत्तेपाईन तुमले दास म्हणस नही, कारण धनी काय करस ते दासले माहीत नही ऱ्हास. पण मी तुमले मित्र म्हणेल शे, कारण जे काही मी आपला पिताकडतीन ऐकी लिधं ते सर्व मी तुमले सांगेल शे. 16 तुम्हीन माले निवाडेल नही, तर मी तुमले निवाडेल अनी नेमेल शे, यामा हेतु हाऊ की तुम्हीन जाईसन फळ द्याव अनं तुमनं फळ टिकावं; अनी जे काही तुम्हीन मना नावतीन पिताकडे मांगशात ते त्यानी तुमले द्यावं. 17 तुम्हीन एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे म्हणीसन मी तुमले या आज्ञा करस.
26 पण जो पितापाईन निंघस, ज्याले मी पिताकडतीन तुमनाकडे धाडस असा मदतगार म्हणजे सत्यना आत्मा ई तवय तो मनाबद्दल साक्ष दी. 27 अनी तुम्हीन बी साक्ष देशात, कारण “सुरवात पाईन तुम्हीन मनासंगे शेतस.”
<- योहान 14योहान 16 ->
Languages