3
जिभ ताबामा ठेवनं
1 मना भाऊ अनी बहिणीसवन तुम्हीन जास्त शिक्षक व्हवु नका कारण तुमले माहीत शे की आपला जास्त कडकपणातीन न्याय व्हई. 2 आपण सर्वाजन बराच गोष्टीसबद्दल चुकतस जर कोणी बोलामा चुकस नही तर तो पुर्ण मनुष्य, तो सर्व शरीर बी ताबामा ठेवु शकस. 3 घोडासनी आपली आज्ञा पाळायला पाहिजे म्हणीसन आपण त्याना तोंडमा लगाम लावतस त्यामुये त्याले जठे पाहिजे तठे आपले फिरावता येस. 4 जहाजसंले बी दखा त्या ईतला मोठा शेतस अनं मोठा वाराघाई लोटाई जातस, तरी चालवणारानी ईच्छा ऱ्हास तिकडे तो त्याले फिरावस. 5 तशीच जिभ बी धाकलस अवयव व्हईसन बी मोठ्या गोष्टीसनी फुशारकी मारस.
तर ईचार करा, कितला धाकला ईस्तव कितला मोठा जंगलले चेटाडस. 6 जिभ बी आग शे, ती अनितीनं भुवन शे, आपला अवयवात सर्व शरीर मळीन करनारा अवयव जिभ शे, ती बहुचक्रले आग लावणारी अनी नरकघाई चेटाडेल अशी शे. 7 श्वापदे, पक्षी, सरपटणारा प्राणी अनी समुद्रमाधला जीव या प्रत्येकना स्वभाव मनुष्य स्वभावना ताबामा व्हयेल शेतस, अनी व्हई राहीनात, 8 पण मनुष्यसपैकी कोणी बी जिभले ताबामा कराकरता समर्थ नही, ती शांतीरहीत शे अनी दुष्ट शे अनं प्राणघातक विषघाई भरेल शे. 9 तिनाद्वारे प्रभु पिता यानी आपण स्तुती करतस अनी देवना प्रतिमानामायक बनाडेल माणुसले तिनाचद्वारे शाप पण देस. 10 तिनाच तोंडतीन स्तुती अनी शाप बी निंघस, मना भाऊ अनी बहिणीसवन अशी गोष्ट व्हणं चांगलं नही. 11 झराना एकच छिद्रामातीन गोड पाणी अनी कडु पाणी निंघस का? 12 मना भाऊ अनी बहिणीसवन, अंजिरले जैतुनना फळं अनी द्राक्षवेलले अंजिर येतीन का? तसच खारा झरामातीन गोड पाणी निंघाव नही.
स्वर्गीय बुध्दी
13 तुमनामा बुध्दीमान अनं समजदार कोण शे, त्यानी बुध्दीपाईन भेटेल लिनतातीन अनी चांगली वागणुकतीन आपला कामे दखाडाले पाहिजे. 14 पण तुमना मनमा जळाऊपणा, कडुपणा, स्वार्थीपणा व्हई तर स्वतःना बुध्दीवर गर्व करीसन सत्यले नाकारू नका. 15 हाई बुध्दी वरतीन उतरस नही तर ते संसारिक, शारीरिक, अनं सैतानी शे. 16 कारण जठे मत्सर अनी स्वार्थीपणा ऱ्हास तठे अव्यवस्था अनी सर्व प्रकारना वाईट गोष्टी व्हतस. 17 वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते शांतीप्रिय, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे, 18 ज्या शांतता करनारा शेतस त्या शांततेमा बी पेरतस अनं न्यायीपणनं पिक मिळवतस.
<- याकोब 2याकोब 4 ->
Languages